Rahul Gandhi News : ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त राहू शकणार नाहीत; राहुल गांधी कडाडले, अभिरूप संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर

Mock Parliament News : मुख्य निवडणूक आयुक्त पदावर ज्ञानेश कुमार जास्त दिवस राहू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी शनिवारी अभिरूप संसदेमध्ये (मॉक पार्लियामेंट) आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. मुख्य निवडणूक आयुक्त पदावर ज्ञानेश कुमार जास्त दिवस राहू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. 'ज्ञानेश कुमार वाचणार नाहीत. आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्ही जे केले आहे, ते आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही.', असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आयोजित अभिरूप संसदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘जन महाभियोग’ प्रस्ताव पारित करण्यात आला. खरगे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात सुमारे २१ विरोधी पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांनी संसदीय कामकाजाच्या धर्तीवर आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले, तर खरगे यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावात विरोधी 'इंडिया' आघाडीकडून मुख्य निवडणूक आयुक्तांवर सहा गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा कट रचणे, मतदारयादीतून १३.२ कोटी मतदारांची नावे वगळणे, संसदेच्या मंजुरीशिवाय 'फॉर्म ६' मध्ये बदल करणे आणि मतदारयाद्यांवर नियंत्रण प्रस्थापित करणे, असे आरोप विरोधकांनी केले आहेत. याशिवाय, ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांना डावलल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

Rahul Gandhi
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

यादरम्यान राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला, 'येत्या काळात ज्ञानेशकुमार मुख्य निवडणूक आयुक्त पदावर जास्त दिवस राहू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यासोबतच येत्या काळात ज्ञानेश कुमार वाचणार नाहीत. आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्ही जे केले आहे, ते आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींची 'आक्रमक' साद: 'दिल्ली चलो'चा नारा, पोलिसांच्या लाठ्यांना न घाबरता 1 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

दुसरीकडे, भाजपने 'इंडिया' आघाडीच्या अभिरूप संसदेवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे इशारा करत म्हटले की, भारतात अराजकता पसरवण्याच्या आपल्या मनसुब्यात अपयशी ठरल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधींना खूश करण्यासाठी हे नाटक आयोजित केले आहे.

Rahul Gandhi
Congress vs BJP protest in Delhi : काँग्रेसचा रामलीला मैदानावर ‘महामोर्चा’, तर प्रत्युत्तरासाठी भाजप सज्ज; 1 नोव्हेंबरला विरोध मार्च, दिल्लीत काय घडणार?

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 1 नोव्हेंबरला काँग्रेसचे आंदोलन

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 1 नोव्हेंबर रोजी आंदोलन होत आहे. काँग्रेसचे 1 नोव्हेंबर रोजी मोठे आंदोलन होत आहे. रामलीला मैदानावरील आंदोलनाला परवानगी मिळाली आहे. यामुळे चिंतेचा कोणताही विषय नाही. हा लोकशाहीसाठीचा लढा आहे. मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन काँग्रेस व सीजेपीच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.