Ashok Gehlot news : मिनी विधानसभेत काँग्रेसचा दणदणीत विजय; गेहलोतांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी टाकले फासे

Rajasthan Congress, Rajasthan Local Body Elections, Rajasthan BJP : मुख्यमंत्री कुणाला करायचे, याचा निर्णय हायकमांडला घ्यायचा आहे. पक्षाचे हित आणि जनतेची इच्छा सर्वात महत्वाची आहे. मलाच सारखे मुख्यमंत्री बनायचेय, असे नाही, अशी भूमिका अशोक गेहलोत यांनी मांडली.
Ashok Gehlot , Sonia Gandhi
Ashok Gehlot , Sonia GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress Victory update : मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपला जोरदार झटका दिला आहे. राज्यातील ३७ जिल्हा परिषदांपैकी काँग्रेसने तब्बल २४ ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. तर ४१९ पंचायत समित्यांपैकी २६६ समित्यांवर पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये जणू शंभर हत्तींचे बळ संचारले आहे.

राज्यातील २०२८ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमधील विजय काँग्रेसला पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी बळ देणारा मानला जात आहे. याचपार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. गेहलोत यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रि‍पदासाठी आपली अप्रत्यक्षपणे दावेदारी सांगून टाकली आहे.

चौथ्यांदा मुख्यमंत्री बनायचे आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर गेहलोत यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, मला पक्षाने खूप काही दिले आहे. मी समाधानी आहे. पण हायकमांडला वाटले तर मुख्यमंत्री होईल. मी दुटप्पी नाही. मात्र, याबाबतीत सध्या काही चर्चा नाही आणि तसेच संकेतही दिले गेले नाहीत, असेही गेहलोत यांनी स्पष्ट केले.

Ashok Gehlot , Sonia Gandhi
Sonia Gandhi Italy House : सोनिया गांधींचे बालपण गेलेल्या इटलीतील घराचे मालक पहिल्यांदाच आले समोर; भारतात येऊन केली मोठी घोषणा

मी राजस्थानमध्येच खूप खूश आहे. सोनिया गांधी यांनी मला खूप काही दिले आहे. इंदिरा गांधी यांनी मला उपमुख्यमंत्री केले. राजीव गांधी यांनी प्रमोट केले आणि नरसिंह राव यांच्या कार्यकाळात मंत्रीही झालो. त्यानंतर तीनवेळा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यामुळे आपल्या राजकीय जीवनाविषयी समाधानी असल्याचे गेहलोत यांनी सांगितले.

Ashok Gehlot , Sonia Gandhi
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

मुख्यमंत्री कुणाला करायचे, याचा निर्णय हायकमांडला घ्यायचा आहे. पक्षाचे हित आणि जनतेची इच्छा सर्वात महत्वाची आहे. मलाच सारखे मुख्यमंत्री बनायचेय, असे नाही. पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाच्या हितासाठी काय चांगले आहे हे ठरवायचे आहे, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले. निवडणुकीतील विजयावर बोलताना ते म्हणाले, आमची एकजुट आहे. सर्वांनी एकत्रितपणे नियोजन केले. त्यामुळे निवडणूक जिंकलो. कारण आपआपसांत वाद व्हावेत, असे कार्यकर्त्यांनाही वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.