Sonia Gandhi Italy House : सोनिया गांधींचे बालपण गेलेल्या इटलीतील घराचे मालक पहिल्यांदाच आले समोर; भारतात येऊन केली मोठी घोषणा

Sonia Gandhi Museum, Sonia Gandhi Birthplace, Sukhdev Singh Kang : सोनिया गांधींचे हे घर भाडेतत्वावर देण्याचे किंवा या घराचे रुपांतर गुरुद्वारात करण्याच्या प्रस्तावाला कुटुंबाने नकार दिला होता. त्यांना सोनिया गांधी आणि मायनो कुटुंबाशी असलेला ऐतिहासिक संबंध जपायचा होता, असे सुखदेव सिंग कांग यांनी सांगितले.
Sonia Gandhi Italy House
Sonia Gandhi Italy HouseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi Childhood Home news : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर त्यांचे इटलीतील वडिलोपार्जित घर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. आई-वडील, घराशी संबंधित अनेक भावना पुस्तकात व्यक्त केल्या आहेत. काही फोटोही पुस्तकात देण्यात आले आहेत. आता याच घराबाबत मोठी माहिती समोर आले आहे.

सोनिया गांधी यांचे इटलीमधील बालपणीचे घर संग्रहालयात रूपांतरित केले जाण्याची घोषणा घराच्या मालकाने केली आहे. इटलीस्थित व्यावसायिक सुखदेव सिंग कांग यांनी २०२० मध्ये हे घर आपली पत्नी व मुलीच्या नावावर विकत घेतले होते. आता पुस्तकाच्या निमित्ताने ही वास्तू पुन्हा चर्चेत आल्यानंतर कांग यांनी संग्रहालयाबाबत भाष्य केले आहे.

कांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या या घराला 'इंडियन हाऊस' म्हटले जाते. त्यावर तिरंगा असून बाहेर लावलेल्या नामफलकावर 'सोनिया गांधी यांचे जन्मस्थान' असा उल्लेख आहे. सोनिया गांधींचा ९ डिसेंबर १९४६ रोजी याच घरात जन्म झाला होता. त्यांनी बालपणीची सुरुवातीची वर्षे तिथेच घालवली होती.

Sonia Gandhi Italy House
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

इटलीच्या व्हिसेन्झा प्रांतातील लुसियाना येथे दगड आणि काँक्रीटच्या इमारतीमध्ये सहा खोल्यांचे हे घर आहे. कांग यांचे ब्रेस्सियामध्ये घर असून ते कुटुंबासह तिथेच राहतात. दोन्ही घरांमध्ये सुमारे एक तासांचे अंतर आहे. सध्या अमृतसर दौऱ्यावर असलेले कांग १९९२ मध्ये होशियारपूरमधील एका गावातून इटलीला गेले. तेव्हापासून ते तिथेच राहत आहेत.

सध्या घरासाठी एका काळजीवाहकाची नेमणूक करण्यात आली असून पर्यटकांना हे घर पाहता येते. या घराची देखभाल आणि मालमत्ता करासाठी वर्षाला सुमारे एक हजार युरो खर्च केला जातो, असे कांग यांनी सांगितले. आपले कुटुंब गांधी कुटुंबाचे प्रशंसक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इटलीमधील काही ओळखीच्या लोकांकडून या घराबाबत माहिती मिळाली होती, त्यानंतर ते विकत घेतल्याचे कांग यांनी नमूद केले.

Sonia Gandhi Italy House
Maharashtra Government Decision : राज्यातील सिमेंट रस्ते, उद्याने, सरकारी इमारतींची कामे ठप्प होणार; सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

सोनिया गांधींचे हे घर भाडेतत्वावर देण्याचे किंवा या घराचे रुपांतर गुरुद्वारात करण्याच्या प्रस्तावाला कुटुंबाने नकार दिला होता. त्यांना सोनिया गांधी आणि मायनो कुटुंबाशी असलेला ऐतिहासिक संबंध जपायचा होता. आता लवकरात लवकर या मालमत्तेचे एका अत्याधुनिक संग्रहालयात रूपांतर करायचे आहे. कुटुंबाशी संबंधित माहितीच्या अभावामुळे या प्रकल्पात अडथळा येत आहे, असे कांग म्हणाले.

सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांना भेटून, प्रस्तावित संग्रहालयात कोणत्या प्रकारच्या वैयक्तिक वस्तू, छायाचित्रे, कागदपत्रे आणि इतर स्मृतीचिन्हे प्रदर्शित करता येतील, याची माहिती घेतील जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.