
Parliament Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा होत आहे. या चर्चेसाठी 16 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या चर्चेची सुरुवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईविषयी माहिती देत असताना ऑपरेशन सिंदूर कोणाच्या दबावात थांबवले नाही. नेमके ते कसे स्थगित केले याची माहिती त्यांनी दिली.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अवघ्या 22 मिनिटांमध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. यामध्ये 100 यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर आम्ही या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या डिजीओएला फोन करून हल्ल्याविषयी सांगितले. सामान्य नागरिकांना टार्गेट करण्यात आले नसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पुन्हा हल्ला करण्याचा विचार नसल्याचे देखील सांगितले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले. पाकिस्तानकडून ७ मेपासून ते १० मेच्या रात्री क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करून हल्ले करण्यात आले. त्यांच्या निशाण्यावर भारताचे लष्करी तळ होते. मात्र, आमच्या संरक्षण प्रणालीने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तान एकाही टार्गेट हिट करू शकली नाही. प्रत्येक हल्ला थोपवण्यात आला. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी तळांना टार्गेट केले. हे हल्ले यशस्वी झाले.
राजनाथ सिंह म्हणाले, या ऑपरेशनचा हेतू युद्ध छेडणे हा नव्हता. १० मे रोजी सकाळी जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एअरफिल्डवर प्रहार केल, तेव्हा पाकिस्तानने पराभव मान्य केला आणि आमच्या डीजीएमओशी संपर्क साधत थांबण्याची विनंती केली. आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर स्थगित केले गेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.