Rajya Sabha bypoll news : पक्षाची सत्ता जाताच खासदारकीचा राजीनामा, आता भाजपकडून तिकीट; विजय निश्चित...

Koyel Mallick BJP candidate, West Bengal Rajya Sabha bypoll : कोयल मल्लिक यांनी एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यानंतर काही दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागला आणि पक्षाची सत्ता गेली.
Koyal Mallik
Koyal Mallik Sarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP candidate update : मागील काही महिन्यांत बंगालच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची सत्ता गेल्यानंतर लोकसभेचे २० खासदार दुसऱ्या पक्षात गेले तर सुमारे ६० हून अधिक आमदारांनीही वेगळा गट स्थापन केला.

राज्यसभेच्या चार खासदारांनी राजीनामा दिला. त्यापैकी तीन नेते आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. तर आणखी एका नेत्याला भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपकडून रविवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये पश्चिम बंगालमधून अभिनेत्री कोयल मल्लिक यांना तर उत्तराखंडमधून पक्षाचे नेते दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. कोयल यांनी १६ जुलै रोजी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्या तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत दाखल झाल्या होत्या.

कोयल मल्लिक यांनी एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यानंतर काही दिवसांत पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल लागला आणि पक्षाची सत्ता गेली. अनेक नेते पक्षाला सोडून जात असतानाच त्यांनीही जुलै महिन्यात खासदारकी सोडली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या एक दिवसही संसदेच्या कामकाजात सहभागी झाल्या नाहीत.

Koyal Mallik
भाजपला हादरा देणारा विरोधी पक्षाचा उमेदवार; अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसोबत

बंगालमध्ये कोयल यांचा मोठा फॅन फॉलोअर आहे. त्यांना उमेदवारी देत भाजपने ममता बॅनर्जी यांना पुन्हा धक्का दिला आहे. तर त्या पक्षाशी जोडल्या गेल्याने राज्यात ताकद वाढणार आहे. कोयल यांनी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. राज्यातील प्रसिध्द अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. ही भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

Koyal Mallik
Devendra Fadnavis SIR : ठाकरे बंधूंची गर्जना सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट; SIR का महत्वाचे? सांगितली आठ कारणे...

दरम्यान, बंगालमधील सध्याचे संख्याबळ पाहता कोयल यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यांच्याविरोधात कुणी उमेदवारीही देणार नाही, असेच दिसते. त्यामुळे त्या बिनविरोध राज्यसभेत पोहोचतील. उत्तराखंडमध्येही भाजपची सत्ता असून दिनेश आर्य यांचा विजय निश्चित आहे. तर उत्तर प्रदेशातही दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. तिथेही भाजपला सात जागा सहजपणे मिळतील. ही निवडणूक १३ ऑक्टोबर रोजी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com