Rajya Sabha Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसोबतच महाराष्ट्रात राज्यसभेचाही धुराळा; आयोगाकडून तारखा जाहीर, कुणाची वर्णी लागणार?

Maharashtra Rajya Sabha bypoll, Sunetra Pawar resignation : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादी काँगेसमधील कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Rajya Sabha Electiom
Rajya Sabha ElectiomSarkarnama
Published on
Updated on

Election Commission schedule : महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरू असतानाच भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकाचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. दोन्ही निवडणुकांसाठीचे मतदान एकाच दिवशी म्हणजे १८ जूनला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत होता. आता या रिक्त जागेसाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १८ जूनला मतदान होणार आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून असेल. तर ११ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदानादिवशी सायंकाळी मतमोजणी होईल. मात्र, राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात सात जागांसाठी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली होती.

Rajya Sabha Electiom
'कॉकरोच जनता पार्टी'चा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा पाहिलात का? राजकीय नेत्यांना बसेल हादरा...

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादी काँगेसमधील कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. सध्या राष्ट्रवातीचे प्रफुल पटेल आणि पार्थ पवार हे दोन खासदार राज्यसभेत आहेत. आता तिसरा सदस्य कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अद्याप त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

Rajya Sabha Electiom
Cockroach Is Back : 'कॉकरोच इज बॅक'! पहिल्यांदाच भाजपवर थेट वार, 'CJP' च्या नव्या पोस्टने वेगळं वळण

राज्यसभेचा निवडणूक कार्यक्रम -

नोटीफिकेशन - १ जून

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - ८ जून

अर्जांची छानणी - ९ जून

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - ११ जून

मतदान - १८ जून (सकाळी ९ ते दुपारी ४)

मतमोजणी - १८ जून (सायं. ५ नंतर)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com