

Indian political leaders party : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. राज्यात एकही आमदार नसताना राज्यसभेत निवडून जाण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे तिन्हीवेळा ते भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीची उमेदवारी जाहीर करताना भाजपने आपल्या उमेदवारांसोबत आठवले यांनाही उमेदवारी जाहीर केली होती. भाजपच्या यादीत आठवले यांचे नाव आल्याने चर्चांना उधाण आले होते. आठवले भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत जोडला असल्याचे सांगत आठवलेंनी स्पष्टीकरण दिले होते. त्याआधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आठवलेंच्या पक्षाचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
आठवले हे २०१६ पासून केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. त्यांच्याकडे सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्रिपद आहे. ते रिपल्बिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पण त्यांच्याकडील खात्यानेच आठवले यांचा पक्ष बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्यांतर्गत असलेल्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या संकेतस्थळावर आठवले यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी असे नमूद करण्यात आले आहे.
विभागाच्या https://depwd.gov.in/en/sri-ramdas-athawale/ या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. या माहितीमध्ये आठवले यांच्या सर्व वैयक्तिक माहितीसह आतापर्यंत त्यांनी भूषविलेले पदे, राज्यसभा तसेच लोकसभेतील सदस्यत्वाचा कालावधी, विविध समित्यांचे पाहिलेले कामकाज आदी माहितीही देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या एका विभागानेच केंद्रीय मंत्र्यांचा पक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संसदेच्या संकेतस्थळासह इतर काही संकेतस्थळावर मात्र आठवले यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेच नमूद करण्यात आले आहे. मात्र, आठवलेंच्याच मंत्रालयाअंतर्गत अलेल्या एका विभागानेच पक्ष बदलण्याची चूक केली आहे. अद्याप ही बाब आठवलेंसह अन्य कुणाचाही लक्षात आली नाही, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.