RBI gold sale : PM मोदींकडून सोनं न घेण्याचे आवाहन अन् 'आरबीआय'ने 12 अब्ज डॉलर किंमतीचे सोने विकल्याची बातमी; बँकेनेच केला खुलासा...

RBI clarification, gold reserves India : रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे तीन जूनपर्यंत सोन्याचा साठा ८८०.५२ टन एवढा स्थिर आहे.
The Reserve Bank of India has clarified its position after reports regarding a large-scale gold sale.
The Reserve Bank of India has clarified its position after reports regarding a large-scale gold sale.Sarkarnama
Published on
Updated on

Reserve Bank of India news : इराण युध्दामुळे भारतासह जगातील अनेक देशांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात देशवासियांना पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. त्यातच रिझर्व्ह बँकेने सोनं विकल्याच्या बातम्या सोशल मीडियातून पसरू लागल्या. त्यामुळे देशात खळबळ उडाली होती. अखेर त्यावर बँकेने खुलासा केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने परकीय चलन साठा वाचविण्यासाठी १२ अब्ज डॉलर किंमतीचे सोने विकल्याच्या बातम्या सोशल मीडियातून पुढे आल्या होत्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

बातम्या चुकीच्या आणि खोट्या असल्याचे बँकेने म्हटले आहे. भारतात सोन्याचा साठा स्थिर आहे. लोकांनी केवळ रिझर्व्ह बँकेने प्रसिध्द केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

The Reserve Bank of India has clarified its position after reports regarding a large-scale gold sale.
Mamata Banerjee news : बंगालच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप; ममता बॅनर्जींच्या हातून पक्ष जाणार? बडतर्फ आमदारानेच घातला घाव

देशाकडे किती सोने?

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे तीन जूनपर्यंत सोन्याचा साठा ८८०.५२ टन एवढा स्थिर आहे. त्याची किंमत तब्बल ११ लाख ३३ हजार ७६ कोटी एवढी आहे.

The Reserve Bank of India has clarified its position after reports regarding a large-scale gold sale.
Delhi fire news : दिल्लीत अग्नितांडव; हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू

दरम्यान, ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, रिझर्व्ह बँकेने आपल्या परकीय चलन साठ्याच्या सुरक्षेसाठी आपल्याकडील सोन्याचा साठा काही प्रमाणात कमी केला आहे. सुमारे १२ अब्ज डॉलर किंमतीचे सोने विकल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com