RBI policy : राहुल गांधींना आर्थिक त्सुनामीची भीती, आता रिझर्व्ह बँकेने वाढविले सर्वसामान्यांचे टेन्शन; मोदी सरकारही चिंतेत

RBI monetary policy, RBI policy June 2026, repo rate : वाढत्या महागाईमध्ये कर्जाचा मासिक हप्ता कमी होईल, अशा आशा असलेल्या कर्जदारांची निराशा झाली आहे.
The Reserve Bank of India announced its latest monetary policy.
The Reserve Bank of India announced its latest monetary policy.Sarkarnama
Published on
Updated on

RBI repo rate : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आर्थिक त्सुनामीची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोदी सरकारसह सर्वसामान्यांची चिंता वाढविली आहे. बँकेकडून आता महागाई दर आणि जीडीपीचा सुधारित अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. इराण युध्दामुळे देशावर आर्थिक संकटाचे ढग घोंघावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बचतीचे आवाहन केले आहे. अनेक अर्थतज्ज्ञांसह राजकीय नेत्यांनीही जीडीपी दर कमी होण्याची तसेच महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांनी देशात आर्थिक त्सुनामी येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. आता रिझर्व्ह बँकेनेही पतधोरण जाहीर करताना देशाचे टेन्शन वाढविले आहे. बँकेने नोकरदारवर्ग आणि कर्जदारांनाही काहीसा दिलासाही दिला आहे. रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याने कर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ होणार नाही.

The Reserve Bank of India announced its latest monetary policy.
Karnataka cabinet : शिवकुमार सरकारला हादरा; खातेवाटपानंतर काही तासांतच कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा

वाढत्या महागाईमध्ये कर्जाचा मासिक हप्ता कमी होईल, अशा आशा असलेल्या कर्जदारांची मात्र या निर्णयामुळे निराशा झाली आहे. दुसरीकडे बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी ग्राहक मूल्य निर्देशांक आधारित महागाई दराच्या अंदाज ४.५ टक्क्यांवरून ५.१ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. याचाच अर्थ पुढील काळात महागाई आणखी वाढणार असल्याचे संकेत बँकेने दिले आहेत.

The Reserve Bank of India announced its latest monetary policy.
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

बँकेकडून देशाच्या जीडीपीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. मोदी सरकारसाठी ही चिंता वाढविणारी बाब ठरणार आहे. बँकेने दिलेल्या संकेतामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढणार आहे. दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तू महाग होऊ शकतात. आगामी काळात इंधनाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. बाजारातील मागणी घटल्याचे त्याचा थेट परिणाम देशाच्या विकासदरावर होईल. सध्याच्या आर्थक संकटामुळे आता सर्वसामान्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयां

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com