RBI repo rate hike : रिझर्व्ह बँकेकडून झटका; कर्जाच्या हप्त्यांसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे

Repo Rate Hike to 5.50%, Loan EMIs Set to Increase : बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव असलेल्या ग्राहकांना मात्र रेपो रेट वाढीचा फायदा होईल.
RBI repo rate hike
RBI repo rate hikeSarkarnama
Published on: 
Updated on: 

RBI repo rate hike 2026 : महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये आधीच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असतानाच रिझर्व्ह बँकेनेही सर्वसामान्यांना झटका दिला आहे. बँकेकडून बुधवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, पर्सलन लोनवरील व्याजदरांत वाढ होणार आहे. परिणामी कर्जाच्या EMI साठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट म्हणजे ०.२५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीची तीन दिवस बैठक चालली. त्यानंतर बुधवारी याबाबतची माहिती देण्यात आली. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता, कच्चे तेल आणि खाद्यान्न वस्तुंच्या वाढत्या किंमती, तसेच जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.

बँकेने सुमारे साडे तीन वर्षांच्या कालावधीनंतर ही वाढ केली आहे. यापूर्वी RBI ने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यावेळी रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढवून ६.५० टक्के करण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ पर्यंत या दरामध्ये ५.२५ टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली होती. मागील दहा महिने रेपो रेट स्थिर होता.

RBI repo rate hike
MLC Election 2026 : भाजपच्या मित्रपक्षाचे चारच आमदार, शिक्षक निवडणुकीसाठी तिघांचे बंड ; अध्यक्षांसोबत उरल्या केवळ आमदार पत्नी

रेपो रेट वाढविण्यात आल्याने बँकांकडून दिली जाणारी कर्ज महागणार आहेत. कारण रेपो रेट म्हणजे आरबीआयकडून अन्य बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याज महागणार असल्याने सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकाही कर्जाच्या व्याजदरात वाढ करतील. परिणामी, होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचे ईएमआय वाढून सर्वसामान्यांच्या खिशावरील ताणही वाढणार आहेत. रेपो रेट वाढीचा परिणाम फिक्स्ट रेटवरील कर्जावरील व्याजदरावर होणार नाही.

ईएमआय किती वाढणार?

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच व्याजदरातही ०.२५ टक्के वाढ होऊ शकते. सध्याचा बँकांचा व्याज दर ७.५० टक्के एवढा असेल तर तो आता ७.७५ टक्के एवढा होईल. समजा एखाद्याने २० वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले असेल तर नव्या व्याजदरानुसार ईएमआयमध्ये ७७७ रुपये वाढ होईल.

RBI repo rate hike
SIR Controversy : न्यायाधीशांच्याही तक्रारी आल्या समोर, निवडणूक आयोगाच्या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी; सुनावणीत अडथळे

मुदत ठेव असलेल्यांचा फायदा

बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव असलेल्या ग्राहकांना मात्र रेपो रेट वाढीचा फायदा होईल. या ग्राहकांनी काही ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत मुदत ठेव स्वरुपात ठेवलेली असते. बँककडून त्यावर निश्चित व्याज दिले जाते. आता रेपो रेट वाढल्याने मुदत ठेवींवरील व्याजही वाढेल. त्याचा ग्राहकांना अतिरिक्त फायदा होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com