MLC Election 2026 : भाजपच्या मित्रपक्षाचे चारच आमदार, शिक्षक निवडणुकीसाठी तिघांचे बंड ; अध्यक्षांसोबत उरल्या केवळ आमदार पत्नी

Bihar Saran Teachers constituency, Upendra Kushwaha, RLM MLAs : उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाचे चार आमदार असून तीन आमदारांनी बंडखोराला पाठिंबा दिला आहे. तर चौथा आमदार म्हणजेच कुशवाह यांच्या पत्नी स्नेहलता या त्यांच्यासोबत आहेत.
BJP | Bihar politics
BJP | Bihar politicsSarkarnama
Published on: 
Updated on: 

NDA politics : महाराष्ट्रासह बिहारमध्येही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणुकीची धामधुम सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये काही मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे. बिहारमध्येही काहीसे असेच चित्र आहे. भाजपच्या मित्रपक्षानेबंडाचे निशाण फडकावले आहे.

बिहारमधील सारण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत NDA ने संयुक्त जनता दलाच्या आनंद पुष्कर यांना उमेदवारी दिली आहे. तर एनडीए सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रदेश महासचिव आणि मुख्य प्रवक्ते रामपुकार सिन्हा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंड केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या बंडाला पक्षाच्याच तीन आमदारांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे.

सिन्हा यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करत एनडीएलाच आव्हान दिले आहे. आरएलएमचे प्रदेशाध्यक्ष व आमदार आलोक कुमार सिंह, आमदार माधव आनंद आणि आमदार रामेश्वर महतो यांनी त्यांचे समर्थन केले आहे. बिहारमधील ही घडामोड महत्वाची मानली जात आहे. कारण मागील काही महिन्यांपासून आरएलएममध्ये बंडखोरीची चर्चा सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांच्याविरोधातच नाराजी आहे.

BJP | Bihar politics
BJP news : भाजपकडून जोरदार झटका; तब्बल 37 वर्षांनंतर माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्य नसणार संसदेत

कुशवाह यांच्या पक्षाचे चार आमदार असून तीन आमदारांनी बंडखोराला पाठिंबा दिला आहे. तर चौथा आमदार म्हणजेच कुशवाह यांच्या पत्नी स्नेहलता या त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पक्षात या निवडणुकीमध्ये मोठी फुट पडल्याची चर्चा आहे. उपेंद्र कुशवाह यांनी पक्षात बंड नसल्याचे सांगत आपला एनडीएच्या उमेदवारालाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, आमदार आलोक सिंह यांनी तिन्ही आमदारांचा अपक्ष रामपुकार सिन्हा यांना समर्थन असल्याचे जाहीर केले आहे.

BJP | Bihar politics
Rahul Gandhi Arrest News : दिल्लीत घमासान; राहुल गांधी, प्रियांका गांधींसह बड्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आरएलएम आमदारांच्या बंडामुळे एनडीएची डोकेदुखी वाढली आहे. जेडीयूच्या उमेदवारासमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, आलोक सिंह यांनी केवळ या निवडणुकीपुरताच अपक्षाला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. आपण एनडीएसोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com