BJP MLA PA Wife Election Defeat : भाजप आमदाराच्या 'पीए'ला पत्नीचा पराभव जिव्हारी; निकालानंतर काही तासांतच गावातील पथदिवे हटवले

Rajasthan News, Priyanka Sharma, Alok Sharma, Ram Sahai Verma : स्थानिकांनी विरोध केल्यानंतर ढाणी परिसरातील सुमारे १० दिवे काढल्यानंतर त्यांनी काम थांबविले. गावच्या सरपंचांनी वीज बिल भरण्याचे सांगितल्यानंतर इतर सुमारे ४० खांबांवरील दिवे काढण्याची कारवाई थांबली.
Rajasthan Streetlights Removal Controversy.
Rajasthan Streetlights Removal Controversy.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan Local Body Elections : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. आमदार, मंत्र्‍यांच्या नातेवाईकांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याचा राग आता मतदारांवर निघण्यास सुरूवात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चक्क गावातील पथदिवे हटविल्याचा आरोप एका उमेदवारावर झाला आहे.

टोंक जिल्ह्यातील पिपलू पंचायत समिती निवडणुकीनंतर अनेक वस्त्यांमध्ये बसवलेले पथदिवे काढून टाकण्यात आले आहेत. निवाईचे भाजप आमदार राम सहाय वर्मा यांचे पीए आलोक शर्मा यांच्या पत्नी यांच्या पत्नी प्रियांका शर्मा या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

पिपलू पंचायत समितीच्या प्रभाग क्र. ४ मधून प्रियांका शर्मा या भाजपच्या तिकीटावर मैदानात होत्या. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच रनोली ग्रामपंचायतींतर्गत ढाणी, बेगमपुरा, हनीफगंज आणि बिजलपुरा या गावांमध्ये विजेच्या खांबांवर सुमारे ५० एलईडी पथदिवे बसवण्यात आले होते. हे पथदिवे आलोक शर्मा यांच्या सांगण्यावरून बसवण्यात आले होते. मात्र, पराभवानंतर ते हटविले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Rajasthan Streetlights Removal Controversy.
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

निवडणूक निकालामुळे नाराज होऊन ही सूडबुद्धीने ही कारवाई झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी अनधिकृत असल्याचे सांगत पथदिवे काढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी विरोध केल्यानंतर ढाणी परिसरातील सुमारे १० दिवे काढल्यानंतर त्यांनी काम थांबविले. गावच्या सरपंचांनी वीज बिल भरण्याचे सांगितल्यानंतर इतर सुमारे ४० खांबांवरील दिवे काढण्याची कारवाई थांबली.

वीज मंडळाच्या म्हणण्यांनुसार हे पथदिवे बेकायदेशीरपणे जोडण्यात आले होते. गावातील वीजपुरवठ्याशी संबंधित बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या पथकाला अनधिकृतपणे बसवलेले दिवे आढळून आल्याने ते काढून टाकण्यात आले. दरम्यान, आता मंडळाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

Rajasthan Streetlights Removal Controversy.
Ashok Gehlot news : मिनी विधानसभेत काँग्रेसचा दणदणीत विजय; गेहलोतांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी टाकले फासे

आमदारांनी आरोप फेटाळले

आमदार रामसहाय वर्मा यांनी राजकीय सूडबुध्दीने कारवाई केल्याचे आरोप फेटाळले आहेत. पथदिवे काढून टाकण्याचा प्रियांका शर्मा यांच्या पराभवाशी काहीही संबंध नाही. हे दिवे दिवाळीच्या काळात उमेदवारांकडून बसवण्यात आले होते. वीज बिल न भरल्याने मंडळाने ही कारवाई सुरू केली होती, असे वर्मा यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर काही तासांतच दिवे काढण्यास सुरूवात केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.