मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील कर कमी अन् लालूंची भविष्यवाणी

आगामी 7 राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा निर्णय घेतला असून, यावर लालूप्रसाद यादव यांनी भूमिका घेतली आहे.
Lalu Prasad Yadav and Narendra Modi
Lalu Prasad Yadav and Narendra Modi
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा फटका भाजपला अनेक राज्यांत नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत बसला होता. यामुळे अखेर पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्यात आली आहे. यावर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी भविष्यवाणी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनंतर हे शुल्क पुन्हा वाढवले जाईल, असे भाकित करुन लालूप्रसाद यादव म्हणाले की, मोदी सरकारने उत्पादन शुल्कात केली असली तरी सामान्य जनतेला यातून कोणताही दिलासा मिळणार नाही. पेट्रोल, डिझेलच्या दरावरील कपात पुरेशी नाही. मोदी सरकारने 5 रुपये कमी करुन केवळ नाटक केले आहे. दरात 50 रुपये कपात झाली असती तर जनतेला मोठा दिलासा मिळाला असता.

लालूंचे पुत्र व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, आधी पेट्रोल 70 रुपये लिटर होते तर ते भाजपवाल्यांना महाग वाटत होते. आता त्यांनी दर शंभरच्या वर नेले आहेत. त्यांनी हे दर 70 रुपयांवर आणायला हवेत.

Lalu Prasad Yadav and Narendra Modi
मोदी सरकारचं 'इलेक्शन गिफ्ट' पडणार 1.4 लाख कोटी रुपयांना!

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excis Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते.

Lalu Prasad Yadav and Narendra Modi
मोदी सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं दिलं हे उत्तर

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com