Ramdas Athawale : लोकसभेची एकही जागा लढवली नाही; रामदास आठवले तिसऱ्यांदा 'Modi 3.0' मंत्रिमंडळात

Narendra Modi Oath Taking Ceremony : रामदास आठवले यांच्या पक्षाला महायुतीच्या जागा वाटपात एकही जागा मिळाली नव्हती. ते राज्यसभा खासदार आहे. त्यांना 'Modi 3.0' सत्तेत शपथ घेतली आहे. त्यांना मंत्रिमंडळात कोणते खाते मिळणार यांची उत्सुकता आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale News : देशात रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाने एकही जागा लढवली नाही. तरी देखील रामदास आठवले यांना 'Modi 3.0' सत्तेत तिसऱ्यांदा मंत्री पदावर संधी मिळाली आहे. रामदास आठवले राज्यसभेचे खासदार आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाला एकही जागा देण्यात आली नव्हती. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. निकालानुसार भाजपला 240, तर महायुतीला 294 जागा मिळाल्या आहेत. महायुती घटक पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली. यानंतर आज 'Modi 3.0' सत्ता स्थापनेचा सोहळा राष्ट्रपती भवन परिसरात रंगला आहे.

रामदास आठवले राज्यसभा खासदार आहेत. त्यांना 'Modi 3.0' सत्तेत शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर पुन्हा वर्णी मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. "मला खूप आनंद आहे की, मला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात संधी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाने गेली दहा वर्षे मोदी यांना समर्थन केले आहे. दलित जनतेला भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आणण्याचे काम रिपब्किन पक्षाने केले आहे", असे रामदास आठवले यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीकडून संविधान बदलाच्या प्रचाराला रिपब्लिकन पक्षाने रोखले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार सत्तेत येत आहे. या मंत्रिमंडळात नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतेही खाते दिले तरी, ते संभाळणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. गेल्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्री होते.

Ramdas Athawale
Swearing in Ceremony of Narendra Modi : ‘इंडिया आघाडी’तील एकच नेता मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार

'Modi 3.0' मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार होती, त्यांना फोन करण्यात आले होते. तसेच या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील प्रमुख नेत्यांसह देशातील प्रमुख नेते, उद्योजक, अभिनेता, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि भाजपच्या नेते, पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मंत्रिमंडळात भाजपच्या प्रमुख नेत्यांना संधी दिल्यानंतर घटक पक्षांना देखील संधी दिली गेली आहे.

Ramdas Athawale
Narendra Modi Oath Ceremony Live Update : मोदींच्या टीममध्ये ‘हे’ असतील मंत्री; वाचा पक्षनिहाय संपूर्ण यादी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com