RSS Jaish Taliban Comparison : RSSला जैश-तालिबानच्या रांगेत बसवले; काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

Congress leader's RSS comparison sparks major political row : आरएसएसच्या नोंदणीवरूनही सवाल; हरिप्रसादांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस-भाजप संघर्ष पुन्हा तीव्र
Congress RSS controversy
Congress RSS controversySarkarnama
Published on
Updated on

Congress RSS controversy : जैश-ए-मोहम्मद, तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यात कोणताही फरक नाही. कारण या तिन्ही संघटनांची भारतात नोंदणी झालेली नाही, असा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (केपीसीसी) अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केला.

हरिप्रसाद यांनी आरएसएसची दहशतवादी संघटनांशी तुलना केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वादग्रस्त विधानाने आरएसएस आणि भाजपबरोबर काँग्रेसचे संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे संकेत आहे.

हरिप्रसाद यांनी ‘वंदे मातरम्’ वादावर केरळ विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. सी. मोहन्नन कुन्नुम्मल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, आरएसएसबाबत त्यांनी योग्यच भाष्य केले, असा दावा केला. हरिप्रसाद यांनी, आरएसएसचे (RSS) कार्यकर्ते कधीही ‘वंदे मातरम्’ किंवा राष्ट्रगीत म्हणत नाहीत आणि तिरंगा ध्वजही फडकवत नाहीत, असे म्हणत डिवचले.

‘वंदे मातरम्’च्या गायनावेळी कथित अडथळा निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर हरिप्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. मोहन्नन कुन्नुम्मल यांनी आरएसएसच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताला विरोध करणाऱ्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ दिला होता.

Congress RSS controversy
Congress opposes BMC Project : 702 कोटींचा भार महापालिकेवरच का? काँग्रेस म्हणाली, 'BMC म्हणजे ATM नाही'

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचाही आरोप

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही आरएसएसच्या नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला होता. आरएसएस कोणत्या भारतीय कायद्यांतर्गत मालमत्ता आणि बँक खाती ठेवते तसेच देणग्या स्वीकारते, हे संघटनेने सार्वजनिकपणे स्पष्ट करावे, अशी मागणी केली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी हिंदू जागरण वेदिकेच्या ‘अखंड भारत संकल्प दिन’ कार्यक्रमात आरएसएसला कायदेशीर नोंदणीची आवश्यकता नसल्याचे म्हटल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे.

Congress RSS controversy
Shiv Sena MP Notice : नोटीस मिळाली नाही म्हणता येणार नाही! शिवेसना ठाकरेंचे शिलेदार थेट बंडखोर खासदारांच्या घरी

वैधानिक दर्जा नसतानाही आरएसएस कार्यरत

आरएसएस 1925 पासून कोणताही वैधानिक दर्जा नसतानाही कार्यरत आहे. ही संघटना लोकांच्या विश्वासावर उभी आहे आणि कागदपत्रांपेक्षा लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे, असा दावा संतोष यांनी केला. देशाच्या फाळणीसह विविध संकटांच्या काळात कोणत्याही सरकारी प्रमाणपत्राशिवाय आरएसएस राष्ट्राच्या पाठीशी उभा राहिला, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com