युद्ध अखेरच्या टप्प्यात? अण्वस्त्र हल्ल्याची रशियाची युक्रेनला थेट धमकी

युक्रेनने तिसऱ्या महायुद्धासाठी चिथावणी देणे थांबवावे
Ukraine War
Ukraine War Sarkarnama
Published on
Updated on

मॉस्को : युक्रेनने (Ukraine) शांतता चर्चा थांबविली असून, आता ते इतर देशांना युद्धात सहभागी होण्यास सांगत आहेत. युक्रेनने अशा प्रकारे तिसऱ्या महायुद्धासाठी चिथावणी देणे थांबवावे, अन्यथा अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा थेट इशारा रशियाचे (Russia) परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी दिला आहे. यामुळे रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो, अशी भीती पुन्हा पसरली आहे. (Russia Ukraine War Updates)

लाव्हरोव्ह यांनी एका मुलाखतीदरम्यान हा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी अमेरिका आणि युक्रेनवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, युक्रेनने शांतता चर्चा मध्येच थांबविली आहे. या चर्चेत अमेरिका आणि ब्रिटनने आडकाठी आणल्याने त्यातून तोडगा निघाला नाही. तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही, असे सगळे जण वारंवार म्हणत आहे. अशी चिथावणी देणे सगळ्यांनी थांबवावे. या संघर्षात नाटोने सहभागी होण्याची युक्रेनची मागणी रशियाला मान्य नाही. युक्रेनला शस्त्रपुरवठा करून नाटो या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे.

Ukraine War
महिला पोलिसाशी गैरवर्तन भोवलं; काँग्रेस आमदाराला न्यायालयाचा दणका

युक्रेनमधील रेल्वे स्थानके आणि इंधन साठे रशियाकडून लक्ष्य केले जात आहेत. लुहान्स्क भागातील क्रेमिना शहर रशियाच्या ताब्यात आले आहे. याचवेळी युक्रेननेही प्रत्युत्तर दिलं आहे. खेरसन भागात युक्रेनकडून रशियाचा शस्त्रसाठा नष्ट करण्यात आला असून, 70 सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाचे चार रणगाडे, 13 चिलखती वाहने, इंधनाच्या दोन गाड्या आणि एक विमानविरोधी तोफ नष्ट केल्याचे युक्रेननं म्हटलं आहे. याचवेळी मारिउपोलमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी युक्रेनने संयुक्त राष्ट्रंसघाला साकडे घातले आहे.

Ukraine War
आव्हाडांना मोठा दिलासा! सीबीआयकडे तपास देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

दोनेत्स्क भागात रशियाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या रणगाड्यांनी आज दोनेत्स्क भागात तोफगोळ्यांचा मारा केला. या माऱ्यात एका शाळेत आश्रय घेतलेल्या चार जणांचा मृत्यू झाला. त्यात नऊ वर्षांच्या एका मुलीचा आणि 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. रशियाकडून मागील 24 तासांत 17 वेळा नागरी वस्त्यांवर हल्ले झाले, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दुसऱ्या महायुद्धात 9 मे रोजी रशियाने विजय मिळविला होता. त्यामुळे पुढील महिन्यात या तारखेपर्यंत युक्रेनमध्ये निर्णायक विजय मिळविचा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचा अट्टाहास आहे. यामुळेच ते आक्रमक लष्करी कारवाया करण्याचे निर्णय घेत आहेत, असा दावा ब्रिटन सरकारने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com