Sajjan Kumar death : काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन; तिहार तुरुंगात भोगत होते जन्मठेपेची शिक्षा

Sajjan Kumar dies, Tihar Jail, former Congress MP, 1984 anti-Sikh riots : इंदिरा गांधी हत्येनंतरच्या शीखविरोधी दंगलीतील दोषी ठरलेले, दिल्लीतील प्रभावी आणि वादग्रस्त काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे ८०व्या वर्षी तुरुंगात निधन.
Former Congress MP Sajjan Kumar
Former Congress MP Sajjan KumarSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरूवारी तिहार तुरुंगात निधन झाले. शीखविरोधी दंगलप्रकरणात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. तुरुंगात तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने सफरदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सज्जन कुमार हे ८० वर्षांचे होते. दिल्लीतून तीन टर्म खासदार राहिलेल्या सज्जन कुमार यांची राजकीय वाटचाल वादग्रस्त ठरली होती. दिल्लीतील प्रभावी नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. दिल्लीत जन्मलेल्या सज्जन कुमार यांची राजकीय कारकीर्द ७० च्या दशकात काँग्रेसमधून सुरू झाली. सुरूवातीला दिल्ली महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी पहिली निवडणूक जिंकली होती.

दिल्ली काँग्रेसचे महासचिव म्हणूनही त्यांनी काम केले. ते १९८०, १९९१ आणि २००४ असे तीनवेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीवेळी मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. तेव्हापासून ते राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. सज्जन कुमार यांना संजय गांधी यांचे निकटर्वीय सहकारी म्हणून ओळखले जात होते. शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने त्यांना डिसेंबर २०१८ मध्ये दोषी ठरविल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडले होते.

Former Congress MP Sajjan Kumar
Caste discrimination : धक्कादायक : माजी केंद्रीय मंत्र्यांच्या आमदार पत्नीशी जातीवरून भेदभाव; अगरबत्तीही पेटवू दिली नाही...

काय होते आरोप?

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भडकलेल्या शीख विरोधी दंगलप्रकरणी सज्जन कुमार यांच्या गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. दंगल भडकविणे, हत्या असे आरोप त्यांच्यावर होते. हायकोर्टाने त्यांना पाच शीखांची हत्या आणि गुरूद्वारा आग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पहिली शिक्षा त्यांना २०१८ मध्ये झाली होती.

Former Congress MP Sajjan Kumar
Congress news : काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या लेकीचे पक्षाच्याच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; आईच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच उडवून दिली खळबळ

फेब्रुवारी २०२५ मध्ये राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने सरस्वती विहार येथ दोन शीखांच्या हत्याप्रकरणाततही त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागातीत हिंसा भडकविण्याच्या आरोपात याचवर्षी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com