Sam Pitroda : काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचा राजीनामा, 'ते' वक्तव्य भोवलं

Congress : पित्रोदा Sam Pitroda यांनी एका मुलाखतीमध्ये उत्तर भारतातील लोक गोरे दिसतात. तर पूर्व भारतातील लोक चिनी वाटतात, असे वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी म्हटले.
Sam Pitroda
Sam Pitrodasarkarnama
Published on
Updated on

Congress News : पूर्वेकडील भारतीय हे चिनी लोकांसारखे आहेत तर दक्षिणेतील आफ्रिकन लोकांसारखे दिसतात या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पित्रोदा यांनी एका मुलाखतीत केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. अखेर आज (बुधवारी) काँग्रेस नेते सॅम पित्रोदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे. पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Sam Pitroda
Sharad Pawar: शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीचं 'परफेक्ट टायमिंग; ऐन निवडणुकीत भाजपवर टाकला मोठा बॉम्ब

पित्रोदा Sam Pitroda यांनी एका मुलाखतीमध्ये उत्तर भारतातील लोक गोरे दिसतात. तर पूर्व भारतातील लोक चिनी वाटतात. दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन तर पश्चिम भारतातील लोक अरब दिसतात. अशा विविधता असलेल्या देशामध्ये तरीही सर्वजण एकत्र राहतात, म्हटले होते.

पित्रोदा यांचे हे विधान समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी Narendra Modi आपल्या जाहीर सभांमध्ये काँग्रेस, राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका करत आहेत. राहुल गांधींचा शहजादा असा उल्लेख करत मोदी म्हणाले होते, अमेरिकेमध्य शहजादेचे एक अंकल राहतात. ते शहजादेचे मार्गदर्शक आहेत. ज्यांच्या त्वचेचा रंग काळा असतो, ते सर्व अफ्रिकन आहेत. याचा अर्थ त्यांनी तुम्हा सर्वांना, माझ्या देशातील लोकांना त्वचेच्या रंगावरून शिवी दिली आहे, असे मोदी म्हणत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसने देखील पित्रोदा यांना फटकारले होते. काँग्रेसनेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटरवरून पित्रोदा यांनी भारतीय विविधतेची केलेली तुलनाही अस्वीकार्य असल्याचे म्हटले होते. रमेश यांच्यावर होत असलेल्या टीकेनंतर त्यांनी आपल्या व्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहे.

Sam Pitroda
Mahadev Jankar: लोकसभेचं मतदान पार पडताच जानकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, 'मेलो तरी चालेल पण कमळ चिन्हावर...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com