भावाच्या पत्नीला भाजपनं फोडताच अखिलेश यादवांनी जाहीर आभार मानून दिला धक्का!

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
Aparna Yadav with Mulayam Singh Yadav and Akhilesh Yadav
Aparna Yadav with Mulayam Singh Yadav and Akhilesh Yadav Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर उत्तर प्रदेशातील राजकारणाने वेग पकडला असून आज मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपमध्ये फाटाफूट करणाऱ्या अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर अखिलेश यांनी भाजपचे जाहीरपणे आभार मानून सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, त्या आमची विचारसरणी घेऊन भाजपमध्ये गेल्या आहेत. आम्हाला तिकिट देणे शक्य नव्हते अशा व्यक्तींना भाजप तिकिट देत आहे. त्यामुळे मी भाजपचे आभार मानतो. याचबरोबर अपर्णा यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्या समाजवादी पक्षाच्या विचारसरणी भाजपमध्ये पोचवून लोकशाहीचाही प्रसार करतील याची मला खात्री आहे. माझ्या वडिलांनी अपर्णा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी ऐकले नाही. जनाधार असलेल्या लोकांना समाजवादी पक्षाने प्रवेश दिला आहे.

Aparna Yadav with Mulayam Singh Yadav and Akhilesh Yadav
रामराजे, मकरंद पाटलांच्या पॅनेलचाच पुन्हा लोणंदमध्ये गुलाल; भाजपला पराभवाचा धक्का

मुलायमसिंह यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाची (Samajwadi Party) धुरा सांभाळत आहेत. मुलायमसिंह यांचे दुसरे पुत्र प्रतिक यांच्या अपर्णा या पत्नी आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर परत मुलायमसिंह आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते.

Aparna Yadav with Mulayam Singh Yadav and Akhilesh Yadav
मोठी बातमी : करोडोंचा चुना लावणाऱ्या विशाल फटेला न्यायालयाचा दणका

आज अपर्णा यांनी सगळ्यांनाच धक्का देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मागील काही दिवसांत समाजवादी पक्षाने भाजपचे तीन मंत्री आणि आठ आमदार फोडल्याने प्रत्युत्तर देण्याची भाजपने तयारी चालवली होती. आता अखिलेश यांच्या भावाच्या पत्नीला फोडून भाजपने मोठा धक्का दिला आहे. अपर्णा यांनी लखनौ कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Aparna Yadav joins BJP)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com