मोठी बातमी : करोडोंचा चुना लावणाऱ्या विशाल फटेला न्यायालयाचा दणका

कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटेची (Vishal Phate) पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.
Vishal Phate presented before court.
Vishal Phate presented before court. Sarkarnama

सोलापूर : अनेक नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal Phate) याला न्यायालयाने (Court) दणका दिला आहे. त्याची दहा दिवसांसाठी पोलीस (Police) कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून फरार असलेला फटे काल (ता.17) सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आला होता.

फटे याला आज (मंगळवारी) बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले. फटेचे वकील विशाल बाबर यांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने त्याला कमी दिवसांची कोठडी द्यावी, अशी बाजू मांडली. ते म्हणाले की, फटे हा तपासाला सहकार्य करणारा असल्याने तो स्वतःहून हजर झाला आहे. त्याने लोकांना फसवलेले नाही. फसवणूक झालेल्यांचा आकडा फुगवलेला आहे. तक्रार करणाऱ्यांनी आरोपीचा फोन लागत नाही अथवा तो सापडत नाही, अशी तक्रार केली आहे. मुदतीत पैसे परत दिले नाहीत, अशी फिर्याद नाही. फटे तपासाला सहकार्य करेल, त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद बाबर यांनी केला.

याला सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी विरोध केला. आरोपीने अनेक जणांना मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्याने परतावा दिला, पण तो देणे अशक्य झाल्यानंतर तो पळून गेला. सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीने 3 कंपन्या सुरू केल्या होत्या. त्याने या माध्यमातून आणखी फसवणूक केली आहे का? याचा तपास सुरु आहे. त्याने पैशांचे नेमके काय केले? याचा शोध होण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे, असे सरकारी वकील न्यायालयाला म्हणाले. अखेर न्यायालयाने फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Court remanded Vishal Phate in police custody)

Vishal Phate presented before court.
करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे 'बिग बुल' बनून आला पोलिसांसमोर!

विशाल फटे (Vishal Phate Scam) याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. आज चौथ्या दिवशीही फटेविरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 81 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

Vishal Phate presented before court.
फडणवीस प्रभारी असलेल्या राज्यात भाजपला बालेकिल्ल्यातच उमेदवार मिळेना!

या प्रकरणी फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरार झाल्यानंतर तो बंगळुरु व कर्नाटकात वास्तव्यास होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com