Political Breaking News : देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षही फुटणार; बड्या नेत्यानं टाकला बॉम्ब

Samajwadi Party Split, Om Prakash Rajbhar : रामगोपाल यादव यांनी पत्रात काय लिहिले होते, हे उघड करावे. खाण प्रकरणात सीबीआयने अखिलेश यादव यांचे नाव घेतले आहे, असेही राजभर यांनी सांगितले.
Lok Sabha
Lok Sabha Sarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्यानंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षही फुटणार असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. एकापाठोपाठ एक विरोधी पक्षांचे खासदार फुटत असल्याने देशात खळबळ उडाली आहे. संसदेत डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याच्या चर्चांना त्यानिमित्ताने उधाण आले आहे.

देशात २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक २४० खासदार निवडून आले होते. त्याखालोखाल काँग्रेसचे ९९ तर समाजवादी पक्षाचे ३७ खासदार संसदेत पोहोचले होते. तृणमूल काँग्रेस २९ खासदारांसह चौथ्या स्थानावर होता. हा पक्ष आता फुटला असून २० खासदार एनसीपीआय या पक्षात दाखल झाले आहेत.

तणमूल फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनाही हादरा बसला आहे. पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला आणि लोकसभेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे खासदारही फुटणार असल्याचा दावा यूपी सरकारमधील मंत्र्‍यांनी केला आहे.

Lok Sabha
Rajabhau Waje news : दिल्लीत पोहोचलेल्या राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले; भर पत्रकार परिषदेत झाले भावूक...

योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी हा दावा केला आहे. राजभर यांनी सपा नेते रामगोपाल यादव यांच्या उल्लेख करत त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एक पत्र दिल्याचे सांगितले. रामगोपाल यादव यांनी पत्रात काही जणांची नावे देत त्यांना कॉल करा आणि सोबत घ्या, पण आम्हाला सुरक्षित ठेवा, असे म्हटल्याचा दावा राजभर यांनी केला आहे.

Lok Sabha
Shiv Sena UBT news : ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब होण्याआधीच ठाकरेंचे तीन खासदार आले समोर; राऊत म्हणाले, जो काय राडा व्हायचाय तो होईल...

रामगोपाल यादव यांनी पत्रात काय लिहिले होते, हे उघड करावे. खाण प्रकरणात सीबीआयने अखिलेश यादव यांचे नाव घेतले आहे, असेही राजभर यांनी सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र, बंगाल सोडा, संपूर्ण समाजवादी पक्ष भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे. तपास यंत्रणांचा जसाजसा फास आवळत चालला आहे, तसतसे सपा नेत्यांमधील चलबिचल वाढत चालली आहे. गोमती रिव्हर फ्रंट प्रकल्प, खाणकाम घोटाळ्याची माहिती संपूर्ण उत्तर प्रदेशला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com