Jagdeep Dhankhar Resign: मोठी बातमी: दिल्लीत येत्या सप्टेंबर महिन्यात राजकीय उलथापालथ; धनखड यांची पहिली 'विकेट'...

Jagdeep Dhankhar resigns as Vice-President : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देताना दिलेलं प्रकृती अस्वस्थतेचं कारण अनेक नेत्यांना खटकले आहे. त्याव काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
Jagdeep Dhankhar resign bjp politics .jpg
Jagdeep Dhankhar resign bjp politics .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

1. उपराष्ट्रपती धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवला.

2. राजकीय उलथापालथीचे संकेत: काँग्रेसच्या जयराम रमेश यांच्यासह अनेक नेत्यांनी या राजीनाम्यामागे काहीतरी राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

3. संजय राऊतांचा मोठा दावा: सप्टेंबरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असून ही केवळ पहिली ‘विकेट’ असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Mumbai News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सोमवारी (ता.21) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे सोपवला आहे.पण जगदीप धनखड यांचा राजीनामा ( Jagdeep Dhankhar Resign) ही दिल्लीतील मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. (Vice President Jagdeep Dhankhar resigns citing health issues; Sanjay Raut claims it's the first ‘wicket’ in a major political shift expected in Delhi by September)

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देताना दिलेलं प्रकृती अस्वस्थतेचं कारण अनेक नेत्यांना खटकले आहे. त्याव काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.त्यांनी धनखड यांच्यासोबत संध्याकाळी 7:30 वाजता फोनवर बोलणं झाल्याचं सांगितलं होतं. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयातही मोठ्या राजकीय हालचाल सुरू होत्या अशी माहितीही समोर आली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी येत्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची खळबळजनक विधान केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही त्या उलथापालथीची पहिली 'विकेट' पडली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jagdeep Dhankhar resign bjp politics .jpg
Jagdeep Dhankhar Resignation : खासदारांकडून कोऱ्या कागदावर सह्या, धनकड यांच्या राजीनाम्यापूर्वी राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

राऊत म्हणाले, भाजपचा एक वरिष्ठ नेता, ज्याचे वय 75 वर्षे आहे, तो उपराष्ट्रपती बनू शकतो, असे संकेत मिळत आहेत. या संभाव्य बदलासाठी एक महत्त्वाचे संविधानिक पद रिकामे करण्यात आले असावे, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय सोयीसाठी हे पद रिकामे केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पंतप्रधान किंवा राजनाथ सिंग यांच्यासारख्या अनेक लोकांची नावे चर्चेत असली तरी, हे पद विशिष्ट सोयीसाठी रिकामे केले असावे, असे मतही खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

Jagdeep Dhankhar resign bjp politics .jpg
Karuna Munde: महाराष्ट्राचं राजकारण हादरवणाऱ्या 'हनी ट्रॅप' प्रकरणात धक्कादायक वळण; करुणा मुंडेंनी 'त्या' महिलेलाच समोर आणलं

संजय राऊतांच्या सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे," असा दावा केल्यामुळे दिल्लीतील अचानकपणे सुरू झालेल्या या घडामोडींवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणांसाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करीत आपल्या पदाचा तत्काल प्रभावानं राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात सर्व खासदारांनी दाखवलेला विश्वास आणि स्नेह आणि आपलेपणा हा आठवणीत राहणारा आणि कायम माझ्या हृदयात राहील असेही म्हटलं आहे.

Jagdeep Dhankhar resign bjp politics .jpg
Tribal Agitation Politics: नरहरी झिरवाळ पुन्हा धावले बिऱ्हाड मोर्चेकर्‍यांच्या मदतीला... विषय मंत्रिमंडळात नेणार!
  1. प्रश्न: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला?
    उत्तर: त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देऊन राजीनामा दिला.

  2. प्रश्न: या राजीनाम्यावर कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत?
    उत्तर: अनेक नेत्यांनी हा राजीनामा राजकीय कारणास्तव असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

  3. प्रश्न: संजय राऊत यांनी कोणता मोठा दावा केला?
    उत्तर: त्यांनी सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे म्हटले आहे.

  4. प्रश्न: उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा देताना काय म्हटलं?
    उत्तर: त्यांनी सर्व खासदार व नेत्यांचे आभार मानून हा कालावधी हृदयात राहील असे पत्रात नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com