Sarpanch Election result : सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर; आधी 36 मतांनी पराभव, चार महिन्यांनी झालेल्या पुनर्मोजणीत 44 मतांनी विजय

Thakri Matta panchayat election, Bharti Thakur, Santosh Kumari, Himachal Pradesh : चार महिन्यांपूर्वी विजयी झालेल्या संतोष कुमारी यांना पुनर्मोजणीत मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे पुनर्मोजणीमध्ये चार मतै अवैधही ठरविण्यात आली.
Bharti Thakur
Bharti ThakurSarkarnama
Published on: 
Updated on: 

Election result update : देशातील अनेक निवडणुकांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका सरपंचपदाच्या निवडणुकीतील धक्कादायक उलटफेर समोर आला आहे. मतदानानंतर झालेल्या निवडणुकीत महिला एका महिला उमेदवाराचा ३६ मतांनी पराभव होतो. त्यावर आक्षेप घेत त्या पुनर्मोजणीची मागणी करतात अन् चार महिन्यांनी त्या ४४ मतांनी विजयी झाल्याचा निकाल लागतो.

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील ही घटना आहे. ठाकरी मट्टा ग्रामपंचायतीची निवडणूक मे महिन्यांत पार पडली होती. सरपंचपदाच्या निवडणुकीत भारती ठाकूर आणि संतोष कुमारी यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत कुमारी यांना ५९७ तर ठाकूर यांना ५६१ मेत मिळाली होती. त्यानुसार ठाकूर यांचा ३६ मतांनी पराभव झाला होता.

निवडणूक निकालावर आक्षेप घेत ठाकूर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुनर्मोजणीची मागणी केली. त्यांच्या मागणीतील आक्षेपांचा विचार करत अधिकाऱ्यांनीही पुनर्मोजणीचे आदेश दिले. त्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीसमोर नुकतीच पुनर्मोजणी झाली. त्यामध्ये ठाकूर यांना ६०१ तर संतोष कुमारी यांना ५५७ मते मिळाली.

Bharti Thakur
MLA disqualified : खासदारकी मिळविण्याच्या नादात आमदारकीही गेली..! सुप्रीम कोर्टाकडून अपात्रतेवर शिक्कामोर्तब

पुनर्मोजणीत ठाकूर या ४४ मतांनी विजयी झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. चार महिन्यांपूर्वी विजयी झालेल्या संतोष कुमारी यांना पुनर्मोजणीत मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे पुनर्मोजणीमध्ये चार मतै अवैधही ठरविण्यात आली. या निकालानुसार आता ठाकूर या ठाकरी मट्टा गावच्या सरपंचपद भूषवतील.

Bharti Thakur
CJP Abhijit Dipke news : मोजके विजय म्हणजे खेळविण्यासाठी टाकलेले तुकडे, आता निवडणुकांवर बहिष्कार टाका! अभिजीत दिपकेंनी घातला घाव...

दरम्यान, निवडणुकीतील उलटफेरानंतर सुरूवातीला झालेल्या मतमोजणीतील गोंधळावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. टपाली मतदानातील घोळ, वैध मते अवैध ठरविणे किंवा अवैध मतांची मोजणी करणे, असे प्रकार समोर आले आहे. अनेकदा कोर्टातही अशी प्रकरणे गेली आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर झालेल्या पुनर्मोजणीत पराभूत उमेदवार विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com