CJP Abhijit Dipke news : मोजके विजय म्हणजे खेळविण्यासाठी टाकलेले तुकडे, आता निवडणुकांवर बहिष्कार टाका! अभिजीत दिपकेंनी घातला घाव...

Cockroach Janata Party, election boycott, Gyanesh Kumar resignation, : विरोधकांचा सहभाग फेरफार झालेल्या निवडणुकांना आधार देत असल्याचे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
CJP founder Abhijit Dipke addresses a press conference in Delhi, demanding the resignation of CEC Gyanesh Kumar and calling for an election boycott.
CJP founder Abhijit Dipke addresses a press conference in Delhi, demanding the resignation of CEC Gyanesh Kumar and calling for an election boycott.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Election Commission controversy latest news : केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी SIR, फॉर्म ६ सह विविध मुद्द्यांवर आक्षेप घेत एकप्रकारे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ही बाब उघड झाल्यानंतर विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला आहे. या वादात आता कॉक्रोच जनता पार्टीनेही उडी घेतली आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरूवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी ४८ तासांत राजीनामा न दिल्यास जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत विरोधी पक्षांवरही घाव घातला आहे. आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन दिपकेंनी केले आहे.

कोणते अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न?

विरोधी पक्षांना उद्देशून दिपके यांनी म्हटले आहे की, फेरफार झालेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही असेच सहभागी होतच राहिला, तर अशा निवडणुकांना तुम्ही एकप्रकारे मान्यता देता आणि त्या निष्पक्ष असल्याचा आभासही निर्माण करता. निवडणुका लढवल्या नाहीत तर तुमचे राजकीय अस्तित्वच संपेल, अशी भीती वाटत असेल. पण तुमची मते चोरली जात आहेत, आमदार-खासदार फोडले जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत, अशावेळी तुम्ही कोणते अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहात?

CJP founder Abhijit Dipke addresses a press conference in Delhi, demanding the resignation of CEC Gyanesh Kumar and calling for an election boycott.
MLA disqualified : खासदारकी मिळविण्याच्या नादात आमदारकीही गेली..! सुप्रीम कोर्टाकडून अपात्रतेवर शिक्कामोर्तब

निवडणुका लढविणे थांबवा

निवडणुकांमध्ये चुकीच्या पध्दतीने काम होत असेल तर राज्य, पक्षाचा विचार न करता तुम्हाला बोलावे लागेल. एखाद्या खेळाचा निकाल कथितपणे निश्चित आहे, असे तुम्हाला वाटतेय, मग तो खेळ तुम्ही तसाच खेळत राहू शकत नाही. तुमचा सहभाग फेरफार झालेल्या निवडणुकांना आधार देत असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. राजकीय अस्तित्वाचा विचार न करता देश आणि लोकशाहीचा आधी विचार करा. ठामपणे भूमिका घेत अशा निवडणुका लढविणे थांबवा, असे थेट आवाहनही त्यांनी केले आहे.

CJP founder Abhijit Dipke addresses a press conference in Delhi, demanding the resignation of CEC Gyanesh Kumar and calling for an election boycott.
Shiv Sena Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे शिवसेना प्रकरणाबाबत मोठं विधान; शिंदेंच्या बाजूने लढणाऱ्या मुकुल रोहतगींनी विषय काढला... आयोगाला सूचक संदेश

विजय म्हणजे फेकलेले तुकडे

फिक्स मॅचमध्ये प्रत्येक झेल न सोडता काही झेल घेतले जातात. मॅच चुरशीची वाटावी म्हणून ती अखेरच्या षटकापर्यंत खेचली जाऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्हालाही काही विजय मिळू दिले जातील, जेणेकरून तुम्ही निवडणुका लढवत राहाल आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसेल. पण हे मोजके विजय म्हणजे तुम्हाला खेळविण्यासाठी टाकलेले तुकडे आहेत, जे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया योग्य असल्याचा आभास निर्माण करणारे आहेत, अशी सडेतोड भूमिका दिपकेंनी मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com