Jammu and Kashmir: निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी; प्रदेशाध्यक्षांवर पहिला वार

Jammu and Kashmir Assembly Election: जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्याने सत्तेपासून वंचित राहावे लागले.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला होता. पण अपेक्षित उमेदवार विजयी न झाल्याने सत्तेपासून वंचित राहावे लागेल. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने काही दिवसांतच राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता न मिळाल्याने भाजपने हे बदल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या काळात रविंदर रैना हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, या निवणुकीत रैना यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता रैना यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी रविवारी ज्येष्ठ नेते सत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सैना यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

BJP
BJP Politics : मोदी ज्यासाठी काँग्रेसवर बरसले, भाजपने काही तासांत तेच केले! जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा...

रैना हे 2018 पासून प्रदेशाध्यक्ष होते. त्यांची मुदत काही महिन्यांपूर्वीच संपली होती. मात्र, निवडणुकीमुळे त्यांच्यावर प्रचाराची धुरा देण्यात आली होती. निवडणूक पार पडल्यानंतर त्यांना लगेच बदलण्यात आले असून इतर राज्यांतील प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सत शर्मा यांना सप्टेंबर महिन्यातच जम्मू काश्मीर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते. भाजप-पीडीपी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. त्यांनी प्रदेश भाजपमध्ये अनेक महत्वाच्या पदांवरही यापूर्वी काम केले आहे.

BJP
Kamala Harris : कमला हॅरिस भावूक; मतदानाच्या दोन दिवसआधी झाली खास व्यक्तीची आठवण

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला 29 जागांवर समाधान मानावे लागले. या सर्व जागा जम्मू विभागात मिळाल्या आहेत. काश्मीर विभागात पक्षासह इतर अपक्ष व पक्षांना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.

नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीने बहुमताच आकडा गाठत राज्यात पुन्हा सत्ता काबीज केली. ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. भाजपची सत्ता आली नसली तर पक्षाला मिळालेले मते इतर पक्षांपेक्षा जास्त आहेत. या निवडणुकीत भाजपला 25.64 तर नॅशनल कॉन्फरन्सला 23.43 टक्के मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com