Kamala Harris : कमला हॅरिस भावूक; मतदानाच्या दोन दिवसआधी झाली खास व्यक्तीची आठवण

US Presidential Election Narendra Modi Donmald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्पत यांच्यात थेट लढत होत आहे.
Kamala Harris
Kamala HarrisSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. संपूर्ण भारतीयांचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या आहे. आता मतदानाला दोनच दिवस बाकी असताना कमला यांना एका खास व्यक्तीची आठवण झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा मतदानाआधी आपल्या आईला भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. त्यांची ही भेट नेहमीच खास असायची. मोदींच्या आई हिराबेन यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. कमला हॅरिस यांनाही मतदानाआधी आपल्या आईची आठवण झाली आहे.

Kamala Harris
Himanta Sarma News : 'राम-कृष्णाची नावे असावीत झारखंडमधील शहरांना' ; हिमंता सरमांचे मोठं वक्तव्य!

कमला यांनी रविवारी सकाळी आईसोबतचा आपला फोटो ‘एक्स’ वर पोस्ट करून भावनिक साद घातली आहे. आईचे धाडस आणि दृढनिश्चय आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘माझी आई डॉ. श्यामला गोपालन हॅरिस वयाच्या 19 व्या वर्षी एकट्या भारतातून अमेरिकेत आली. मी आज जी काही आहे, ते तिचे धाडस आणि दृढनिश्चयामुळे.’

हॅरिस यांच्या आई एक शास्त्रज्ञ होत्या. त्यांच्याविषयी त्या अनेकदा आपल्या भाषणांमध्ये बोलल्याही आहेत. याच आठवड्यात वॉशिंग्टन येथे झालेल्या रॅलीमध्ये कमला यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आईचा जास्तवेळा उल्लेख केला होता.

Kamala Harris
Prashant Kishor on Party Symbol : प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं, पक्षाचं निवडणूक 'चिन्ह स्कूल' बॅग का?

रंगभेदाबाबतच्या आपल्या आईच्या अमेरिकन अनुभवाबद्दल देखील कमला हॅरिस बोलल्या आहेत. पण ही बाब स्वतःच्या जीवनाशी संबंधित असल्याने त्या क्वचितच यावर चर्चा करतात. निवडून आल्यास त्या पहिल्या महिला अमेरिकेच्या अध्यक्षा होतील, तसेच दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आणि राष्ट्राध्यक्षपदी असतील, असा उल्लेख करणेह हॅरिस यांच्याकडून टाळले जाते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर पहिल्या भाषणातही त्यांनी आईच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर सांगितले होते. दरम्यान, त्यांच्या आई श्यामला या तमिळनाडूतून अमेरिकेत गेल्या होत्या. तिथे जमैकातून स्थलांतरीत झालेल्या डोनाल्ड हॅरिस यांच्याशी 1960 मध्ये भेट झाली. कॅलिफोर्निया विद्यापीठाती भेटीनंतर त्यांनी विवाह केला. कमला हॅरिस यांचा जन्म 1964 मध्ये झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com