Dammam Airport Attack : सौदीत विमानतळावर भीषण हल्ला! एका भारतीयाचा मृत्यू, 8 जणांवर उपचार सुरू

Saudi Arabia Dammam Airport Attack : सौदीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, दमान विमानतळावर बुधवारी झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका सौदी नागरिकासह भारतीय नागरिकाचा समावेश आहे. जखमी झालेल्या आठ जणांमध्ये दोन भारतीय, दोन येमेनी, दोन बांगलादेशी, एक नेपाळी आणि एका सौदी नागरिकाचा समावेश आहे.
Dammam Airport Attack | Indian Citizen Killed | Saudi Arabia
Dammam Airport Attack | Indian Citizen Killed | Saudi ArabiaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dammam Airport Attack : सौदी अरेबियातील दमान विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य दोन भारतीयांसह आठ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका सौदी नागरिकाचाही मृत्यू झाला. सौदीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (GACA) याबाबत माहिती दिली असून, भारतीय दूतावासाने मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेनंतर भारतीय दूतावासाने दुःख व्यक्त केले आहे. मृत नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमी भारतीय लवकर बरे व्हावेत, अशी आशा दूतावासाने व्यक्त केली. घटनेचे नेमके स्वरूप आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी सौदी अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचेही दूतावासाने स्पष्ट केले.

आठ जण जखमी

सौदीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, दमान विमानतळावर बुधवारी झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका सौदी नागरिकासह भारतीय नागरिकाचा समावेश आहे. जखमी झालेल्या आठ जणांमध्ये दोन भारतीय, दोन येमेनी, दोन बांगलादेशी, एक नेपाळी आणि एका सौदी नागरिकाचा समावेश आहे. जखमींना वेगवेगळ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार केले जात आहेत.

Dammam Airport Attack | Indian Citizen Killed | Saudi Arabia
Ahilyanagar DCC Bank Election : लोकसभेपासून असलेली थोरातांची साथ सुटली? जिल्हा बँकेत लंकेंची वेगळी वाट? राम शिंदेंसोबतच्या बैठकीने चर्चेला उधाण

हल्ल्यामागे कोण?

येमेनमधील हूती बंडखोर आणि सौदी अरेबियासह आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दमान विमानतळावरील हल्ल्याकडे पाहिले जात आहे. यापूर्वी रियाध विमानतळावरही हल्ल्याची घटना घडली होती. मात्र, दमानमधील हल्ला कोणी केला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Dammam Airport Attack | Indian Citizen Killed | Saudi Arabia
Marathwada Graduate Constituency: 'पदवीधर'च्या निवडणुकीत मतपेटीतून उमटणार राजकीय कौल; महायुती विरुद्ध आघाडी थेट फाईट

दरम्यान, हल्ल्यामुळे विमानतळाचे झालेले नुकसान आणि सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे GACA ने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com