Electoral Bond News : मोठी बातमी ! ...अखेर SBI ने आयोगाला निवडणूक रोख्यांचा डेटा पाठवला; प्रसिद्ध कधी होणार?

Electoral Bond Data News : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व निवडणूक रोख्यांचा तपशील आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सादर केला आहे.
Electoral Bond News
Electoral Bond NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : निवडणूक रोखे या प्रकरणी साेमवारी (दि. 11 मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही सुनावणी केली होती. या याचिकेत राजकीय पक्षांना दिले गेलेल्या सर्व निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत मागितली गेली होती. मात्र, न्यायालयाने यावर कठोर निर्देश देत सर्व तपशील एका दिवसात (12 मार्चपर्यंत) देण्यास सांगितले. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंतच मागणी करणारी स्टेट बँकेचा विनवणी न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व निवडणूक रोख्यांचा तपशील आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सादर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कठोरपणे आदेश देत एसबीआयवर ताशेरे ओढत इशाराच दिला होता. जर एसबीआयने 12 मार्चपर्यंत निवडणूक रोख्यांच्या आयोगाकडे तपशील देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com