बेंगलुरू : वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. रविंद्रनाथ यांनी मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. याबाबत त्यांनी थेट मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यात गंभीर आरोप केले आहे. दोन आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकारचा दबाव वाढत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राज्यात आहे. रविंद्रनाथ यांनी त्यांच्या सेवेत चौथ्यांदा राजीनामा दिला आहे. (IPS P. Ravindranath Latest Marathi News)
रविंद्रनाथ यांच्याकडे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक हे पद होते. त्यांची नुकतीच प्रशिक्षण महासंचालक या पदावर बदली करण्यात आली होती. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळेच आपली कोणत्याही ठोस कारणाशिवाय बदली करण्यात आल्याचा आरोप रविंद्रनाथ यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांनी वरिष्ठांकडून छळ करून पदोन्नतीत डावलले जात असल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता.
रविंद्रनाथ यांनी कर्नाटकच्या (karnataka) मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मुख्य सचिवांच्या उदासीनतेमुळे वेदना होत आहेत. आपली मुदतीपुर्वीच बदली करण्यात आली आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई सुरू केल्याने ही बदली करण्यात आल्याचे रविंद्रनाथ यांनी म्हटले आहे. (IPS P. Ravindranath Resigns)
रविंद्रनाथ यांनी नुकतीच याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमदार रेणुकाचार्य यांची मुलगी आणि एका विधान परिषद आमदाराच्या कुटुंबातील सदस्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची माहिती दिली होती.
पश्चिम घाटातील उच्च जातीतील अनेक कुटुंबांनी अनुसुचित जाती व जमातीचे बनावट जातत प्रमाणपत्र बनवल्याचा दावा रविंद्रनाथ यांनी केला होता. त्याचा तपास सुरू करण्यात आला होता. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणांना कायदेशीर कारवाई करण्याची शिफारसही केली होती. त्यामुळेचे त्यांची दोन वर्षातच अन्यत्र बदली करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.