Sharadwat Mukherjee: '...जर मुख्यमंत्र्यांनी हात काढला तर 58 बंडखोर आमदारांचा ग्रुप संपुष्टात येईल!'; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

Trinamool Congress Crisis: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. यानंतर टीएमसीच्या 58 आमदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडला होता. विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ या आमदारांच्या गटाला मंजुरीही दिली होती.
Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)
Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)Sarkarnama
Published on: 
Updated on: 

West Bengal News: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती.यानंतर टीएमसीच्या 58 आमदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडला होता. विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ या आमदारांच्या गटाला मंजुरीही दिली होती. आता याच बंडखोर आमदारांबद्दल भाजप आमदारांनी खळबळजनक विधान केलं आहे.

पश्चिम बंगालचे आरोग्यमंत्री शरद्वत मुखर्जी यांनी बिधाननगर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या पाठिंब्यावरच ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा 58 आमदारांचा गट टिकून आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा काढून घेतल्यास या गटाचे अस्तित्वच संपुष्टात येईल, असा दावा मुखर्जी यांनी केला आहे.

तसेच मुखर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील MAITC ला ‘मृत तृणमूल’ असे संबोधले आहे. त्यांनी यावेळी ऋतब्रत बॅनर्जी यांचा गट मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यावर काम करत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर डाव्या पक्षाचे नेते शतरूप घोष यांनी शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपसमोरचे प्रमुख राजकीय आव्हान आता तृणमूल काँग्रेस नसून डावे पक्ष आणि माकप (CPI-M) हे असल्याचं बिधाननगरच्या बैठकीत मुखर्जी म्हणाले. MAITC चे आमदार कुणाल घोष यांनी मुखर्जी यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना भाजपचा खरा हेतू उघड झाला असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा गट भाजपच्या पाठिंब्यावर कार्यरत असल्याच्या आरोपांना मुखर्जी यांच्या या वक्तव्यानं दुजोरा मिळाला आहे असंही त्यांनी सांगितलं.

Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image)
Sanjay Shirsat: 'माझा राजीनामा म्हणजे खाऊ वाटला का?' संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिरसाटांचा एकनाथ शिंदेंना इशारा?

दरम्यान, ऋतब्रत बॅनर्जी गटाचे आमदार अखरुज्जमान यांनी मुखर्जी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आमदारांनी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक जिंकली असून ते कोणाच्याही पाठिंब्यावर अवलंबून नाहीत. सुवेंदू अधिकारी यांनी 280 आमदारांचा पाठिंबा असल्याचा केलेला दावा फेटाळण्याचं आव्हान देत, 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात फ्लोअर टेस्टद्वारे (बहुमत चाचणी) प्रत्यक्ष संख्याबळ स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.