Ishan Tharoor Layoff : ऑपरेशन सिंदूरवर शशी थरुर यांना लेकाने विचारला होता प्रश्न; 8 महिन्यात कंपनीने दाखवला घरचा रस्ता

Ishan Tharoor laid off from The Washington Post: शशी थरुर यांच्या मुलाला कामावरून काढून टाकल्याने वाद निर्माण झाला आहे. नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर माहिती
Shashi Tharoor and his Son Ishan Tharoor
Shashi Tharoor and his Son Ishan TharoorSarkarnama
Published on
Updated on

Shashi Tharoor's reaction to son Ishan's layoff : शशी थरुर यांचे पुत्र ईशान थरूर यांना नोकरीवरून काढून टाकल्याची बातमी समोर आल्यानंतर नेमकं काय घडलं याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकन वृत्तपत्राने मोठा निर्णय घेत आपल्या कर्मचाऱ्यांना नोकर कपातीचा मोठा धक्का दिला आहे.

वॉशिंग्टन पोस्टने तब्बल ३०० हून अधिक पत्रकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. या नोकर कपातीमध्ये शशी थरूर यांचे मुलगा ईशान थरूर यांचाही समावेश आहे.

वॉशिंग्टन पोस्ट या अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्राने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलत्या मीडिया उद्योगातील आर्थिक आव्हाने, डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढती स्पर्धा आणि उत्पन्नातील घट यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रक्रियेत तब्बल ३०० हून अधिक पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे. या यादीत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार ईशान थरूर यांचाही समावेश आहे.

Shashi Tharoor and his Son Ishan Tharoor
UPSC 2026 : IAS-IPS होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! UPSC 2026 चे नोटिफिकेशन प्रसिद्ध; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

या निर्णयानंतर ईशान थरूर यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, वॉशिंग्टन पोस्टमधील आंतरराष्ट्रीय विभागातील बहुतांश सहकारी या कपातीमुळे प्रभावित झाले आहेत.

जवळपास १२ वर्षे ज्यांच्यासोबत काम केलं, असे संपादक, वार्ताहर आणि पत्रकारांपासून दूर व्हावं लागत असल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता करणाऱ्या या टीमसोबत काम करणं हा त्यांच्या आयुष्यातील सन्मानाचा काळ होता.

ईशान थरूर यांनी जानेवारी २०१७ मध्ये ‘वर्ल्डव्ह्यू’ हा कॉलम सुरू केला होता. जागतिक राजकारण, युद्ध, संघर्ष, मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय धोरण यांचा सखोल पण सोपा आढावा वाचकांपर्यंत पोहोचवणं हा या स्तंभाचा उद्देश होता.

या स्तंभाला गेल्या अनेक वर्षांत जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आठवड्यातून अनेक वेळा हा कॉलम वाचणारे सुमारे पाच लाख नियमित वाचक असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि या सर्वांचे मनापासून आभार मानले.

ईशान थरूर यांचा जन्म १९८४ साली सिंगापूरमध्ये झाला. त्यांना कनिष्क थरूर नावाचा जुळा भाऊ आहे. त्यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठातून इतिहास तसेच वंश, जातीयता आणि स्थलांतर या विषयांत पदवी शिक्षण पूर्ण केलं.

शिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सुडलर फेलोशिपही मिळाली होती. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात २००६ साली ‘टाइम’ मासिकात रिपोर्टर म्हणून झाली. पुढे त्यांनी याच संस्थेत न्यूयॉर्क विभागात सीनियर एडिटर म्हणून काम केलं.

Shashi Tharoor and his Son Ishan Tharoor
UPSC Rule Change : UPSC चा मोठा दणका! आता IAS-IPS अधिकाऱ्यांना पुन्हा परीक्षेची दारे बंद? पाहा काय आहेत नव्या अटी

२०१४ मध्ये ईशान यांनी ‘टाइम’ सोडून वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रवेश केला आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील त्यांच्या विश्लेषणामुळे ते लवकरच वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. गतवर्षी झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, शशी थरुर यांच्या नेतृत्वात भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेला गेले होते. त्यावेळी त्यांनी थेट वडिलांनाच प्रश्न विचारणाऱ्याचे धाडस दाखवले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com