फडणवीसांपासून सुरुवात, कंबोज यांच्यावर शेवट : राऊतांनी भाजप नेत्यांना ओळीने झोडपले...

Sanjay Raut | Shivsena | Press Conference : अनेक मोठ्या आरोपांचे बॉम्बस्फोट
Sanjay Raut Letter To Vice President
Sanjay Raut Letter To Vice President Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना (Shivsena) भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी केंद्रातील भाजप सरकार, केंद्रातील भाजप नेते, राज्यातील भाजप पक्ष आणि भाजपचे नेते यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच अनेक मोठ्या आरोपांचे बॉम्बस्फोट त्यांनी केले. या हल्ल्याची सुरुवात त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून केली. तसेच सोमय्या पिता-पुत्र, सुधीर मुनगंटीवर यांच्यावर आरोप करत त्यांनी मोहित कंबोज यांच्यावर शेवट केला.

संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात 25 हजार कोटींचा घोटाळा झालाय. तसेच महाआयटीमध्ये ५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असाही आरोप त्यांनी केला. फडणविसांच्या काळातील ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे आहेत. ते सगळे कागदपत्र घेवून आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut Letter To Vice President
राजकारण तापलं! संजय राऊतांनी सोमय्यांसह त्यांच्या मुलालाही आणलं अडचणीत

फडणवीस यांच्यावरील आरोपानंतर राऊतांनी आपला मोर्चा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे वळवला. किरीट सोमय्या हा मुलुंडचा दलाल आहे, भडवा आहे. तो मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला होता, असा आरोप करत त्यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले. संजय राऊत म्हणाले, PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली, असा ही आरोप त्यांनी केला.

निकॉन कन्स्ट्रक्शनमार्फत २ ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे. तसेच किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा, अशीही मागणी संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायची हे यांचे धोरण आहे. हा किरीट सोमय्या भाजपचा मुंबईतील चेहरा आहे. राजेंद्र लखाणी हा सोमय्या यांचा फ्रॅंटमॅन आहे, असा घणाघात त्यांनी केला.

Sanjay Raut Letter To Vice President
पीएमसी बॅंक मी पाहिलीही नाही

PMC बॅंक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचे कागद मी ईडीला पाठवले आहेत. हा सोमय्या ईडीच्या कार्यालयात दही आणि खिचडी खातो. तुम्ही तेथे मराठी माणसाला बोलविणार. हे सारे लोक ईडीचे वसुली एजंट बनले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाले, फटाकेवाले, नेल पॉलिश करणारे, मेहंदी लावणारे यांच्याकडे ते गेले. मुलीच्या लग्नातील टेलरकडेही ईडीचे लोक गेले होते. पण माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आम्ही काही बोललो का? त्यांच्या मुलीच्या लग्नातील सेट साडेनऊ कोटी रुपयांचा होता. जंगलाचा फिल यावा म्हणून सजावट जंगलातील सामान आणून केले होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी अखेरीस भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. त्यांच्यासाठी संपवलेली पत्रकार परिषद राऊत यांनी पुन्हा सुरु केली. मोहित कंबोज हा फडणवीसांचा फ्रंट मॅन आहे. तो फडणविसांना बुडविणारा आहे, असे राऊत म्हणाले. तसेच राकेश वाधवानकडून १२ हजार कोटी रुपयाची जमीन मोहित कंबोजने १०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com