Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेवर श्रीकांत शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले ‘NDAच्या नंबरपेक्षा....’

Shrikant Shinde's Big Claim : इंडिया आघाडीने तोडीस तोड खेळी करताना आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एनडीएच्या मताला सुरुंग लागेल, असा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 08 September : उपराष्ट्रपतिपदासाठी नवी दिल्लीत उद्या (ता. 08 सप्टेंबर) मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि इंडिया आघाडीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. ‘एनडीए’कडे बहुमताचा आकडा असला तरी भाजप नेत्यांनी गाफील न राहता दगाफटका होणार नाही, याची पुरेपर काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडीच्या नेत्यांना क्रॉस व्होटिंगचा चमत्कार घडण्याची अपेक्षा आहे. तशी त्यांच्याकडून व्यूहरचनाही करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मोठा दावा केला आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर रिक्त उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणित ‘एनडीए’कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने तोडीस तोड खेळी करताना आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील एनडीएच्या मताला सुरुंग लागेल, असा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आहेत. आंध्र आणि तेलंगणमधील खासदार भूमिपुत्राच्या भूमिकेतून रेड्डी यांना मतदान करतील, अशी अपेक्षा इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी प्रतिभाताई पाटील यांच्या निवडणुकीच्या दाखला दिला जात आहे.

इंडिया आघाडीची नेत्यांना क्रॉस व्होटिंगची अपेक्षा असताना ‘एनडीए’ने मात्र अतिरिक्त मते मिळविण्याची तयारी केली आहे, असे सूतोवाच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले, उपराष्ट्रपतिपदाच्या उद्याच्या निवडणुकीच्या जो नंबर आपल्याला दिसेल, त्यात एनडीएचे संख्याबळ आहे, ते तर असणारच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन इतर पक्षातील लोकही सी. पी. राधाकृष्णन यांच्यासोबत उभे रहिलेले आपल्याला पाहायला मिळतील, असा दावा केला.

Shrikant Shinde
Shahajibapu Patil : शहाजीबापूंच्या फॉर्म्युल्याने महायुतीत पडणार वादाची ठिणगी; ‘भाजपला पदवीधर, तर शिवसेनेला शिक्षक’ मग राष्ट्रवादीचे काय?

कुठल्या पक्षाचे खासदार सी.पी. राधाकृष्णन यांना मतदान करणार आहेत, हे आताच तुम्हाला सांगितले तर कसे होईल. राधाकृष्णन यांना उद्या जेव्हा एक्स्ट्रा मते पडतील. ती मते एनडीएला पडलेली दिसतील. तेव्हा संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

Shrikant Shinde
Kolhapur Viral Photo : ठाकरेंचा निकटवर्तीय शिलेदार शिंदेंच्या माजी खासदारासोबत हॉटेलमध्ये एकत्र; व्हायरल फोटोने खळबळ!

श्रीकांत शिंदे म्हणाले, एनडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील. तसेच, आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जूनराम मेघवाल हेही उपस्थित होते. बैठकीत कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे. मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान कसं करायचं याबाबत मार्गदर्शन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com