Siddaramaiah Meet Rahul Gandhi : सिध्दरामय्यांनी दिल्लीत जाऊन केली राहुल गांधींची कोंडी; लेकासाठी मागितलं मोठं पद...

Siddaramaiah son political role : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत राहुल गांधींची भेट घेत मुलासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या पदाची मागणी केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर.
siddaramaiah
siddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. राजधानीत त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांनी राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या नियुक्त्यांसाठी काही पसंतीच्या नेत्यांची नावे पक्ष नेतृत्वाकडे दिली आहेत. याशिवाय नव्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. आपल्या गटातील विश्वासू नेत्यांना सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाव्यात, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

siddaramaiah
Sunetra Pawar: बीड जिल्हा पुन्हा वाऱ्यावर, सुनेत्रा पवार ठरतायेत 'वन डे पालकमंत्री'!

विशेष म्हणजे, सिद्धरामय्या यांनी आपल्या पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांच्यासाठी नव्या सरकारमध्ये प्रभावी मंत्रालयांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे. वैद्यकीय शिक्षण, उद्योग, जलसंपदा आणि मागासवर्गीय कल्याण यांसारखी महत्त्वाची खाती यतींद्र यांच्याकडे द्यावीत, अशी त्यांची इच्छा असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत या मुद्द्यावर मोठी राजकीय चर्चा झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये नेतृत्वबदलानंतर डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी पक्षातील हालचालींना वेग आला आहे. सिद्धरामय्या यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्यातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

siddaramaiah
Ashok Kharat : भोंदू खरातपाठोपाठ राज्यात भोंदूगिरीचे अर्धशतक, पोलिसांनी 50 जणांचा उधळला दरबार

राजकीय विश्लेषकांच्या मते, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघेही कर्नाटक काँग्रेसमधील प्रभावी चेहरे आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे आणि खातेवाटप करताना पक्ष नेतृत्वाला संतुलन राखावे लागणार आहे. दिल्लीतील बैठकींच्या मालिकेनंतर लवकरच मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळाबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com