Sidhi Pee Case : 'त्या' आदिवासी तरुणाचे पाय धुवून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; काय आहे प्रकरण ?

BJP Leader Pee On Adivasi Yuvak : भाजपनेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी
Shivraj Chauhan
Shivraj Chauhan Sarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP News : एका अदिवासी तरुणावर भाजप नेत्याने लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. लघुशंका करणाऱ्या भाजपनेत्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका झाली. यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी पीडित आदिवासी युवकाचे पाय धुतले. तसेच झालेल्या प्रकाराबाबत माफीही मागितली. (Latest Political News)

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुबरी गावातून दोन दिवसांपूर्वी संतापजनक प्रकार समोर आला होता. यात एका आदिवासी तरुणावर भाजपच्या प्रवेश शुक्ला या पदाधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केली होती. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर आरोपी शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सिद्धीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंजुलता पटले यांनी सांगितले.

Shivraj Chauhan
Bawankule On Sharad Pawar: परिवारातले लोक सोडून जात आहेत, आता शरद पवारांनी आपलं घर सांभाळावं !

या प्रकारणाची दखल खुद्द मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली. मुख्यमंत्री चौहान यांनी संबंधित पीडित तरुणाला गुरुवारी (ता. ६) भोपाळमध्ये आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. यावेळी त्या आदिवासी तरुणारा त्यांनी खुर्चीवर बसवले. त्यावेळी मुख्यमंत्री चौहान त्यांच्या पायापाशी बसले. चौहान यानी स्वतः त्याचे पाय धुतले. झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी तरुणाची माफीही मागितली. यानंतर त्या व्यक्तीचा टिळा लावून, हार घालून सन्मान केला. तसचे या पीडित तरुणाला श्रीगणेशाची एक प्रतिमा भेट दिली.

मुख्यमंत्री चौहान यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. चौहान म्हणाले, "झालेला प्रकार अत्यंत खेदजनक आहे. त्याबद्दल आदिवासी तरुणाची माफी मागितली. जनता आपल्यासाठी देवासमान आहे. जनतेची सुरक्षा हेच माझे प्राथमिक कर्तव्य आहे." दरम्यान, मध्यप्रदेशातील झालेल्या प्रकारामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली.

Shivraj Chauhan
Maan News : पानपट्टीवाल्याचा पोरगा झाला फौजदार; दहिवडीच्या अजिंक्य पवारचे यश

राहुल गांधी म्हणाले होते की, "भाजपप्रणित सरकारमध्ये आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक वर्गातील जनतेवर अत्याचार होतात.आता ते वाढले आहेत. दलित आणि आदिवासींबाबत द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे." राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री चौहान यांनी पीडित तरुणाचा सन्मान केला आहे. यातून भाजपने सरकारची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.