

New Delhi News : देशातील चार राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सहा दिवस चार राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी आज छत्तीसगडमधील बिलासपूर येथे निवडणूक रॅली घेणार आहेत. यासोबतच दुपारी 12 वाजता परिवर्तन महासंकल्प रॅलीला संबोधित करणार आहेत.
छत्तीसगडमधील बिलासपूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या 'परिवर्तन यात्रे'च्या समारोप सोहळ्यालाही नरेंद्र मोदी शनिवारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या तीन महिन्यांतील पंतप्रधानांचा हा तिसरा छत्तीसगड दौरा आहे. छत्तीसगडसह या वर्षाच्या अखेरीस देशभरातील पाच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान बिलासपूर येथील सायन्स कॉलेजच्या मैदानावर शनिवारी दुपारी २ वाजता 'परिवर्तन महासंकल्प रॅली' या दोन परिवर्तन यात्रेच्या समारोप समारंभाला संबोधित करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ यांनी दिली आहे.
त्याचबरोबर, कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिस, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG), छत्तीसगड सशस्त्र दल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि होमगार्ड्सचे १५०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या तीन किलोमीटरच्या परिघाला 'नो फ्लाइंग झोन' घोषित करण्यात आले असून, तेथे ड्रोनविरोधी तोफाही तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
अरुण साओ म्हणाले, भाजपची पहिली परिवर्तन यात्रा 12 सप्टेंबर रोजी दंतेवाडा येथून, तर दुसरी 15 सप्टेंबर रोजी जशपूर येथून काढण्यात आली होती. दोन्ही दौऱ्यांमध्ये त्यांनी 87 विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढली. तर बिलासपूरमध्ये ही यात्रा संपण्यापूर्वी या यात्रांमध्ये 83 स्वागत सभा, चार रोड शो आणि विविध जाहीर सभा घेण्यात आल्या. नक्षलग्रस्त विजापूर, सुकमा आणि अंतागड मतदारसंघांत ही यात्रा काढण्यात आली नाही. परंतु ही यात्रा जवळच्या मतदारसंघातून गेली तेव्हा या मतदारसंघातील लोक त्यात सामील झाले होते.
त्याच बरोबर, येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दौऱ्यात पंतप्रधान एकूण चार राज्यांचा दौरा करणार आहेत. यात सर्वात आधी राजस्थान आणि मध्य प्रदेशचा दौरा असेल. त्यानंतर 3 ऑक्टोबरला छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांचा दौरा असेल. याशिवाय 5 ऑक्टोबरला पुन्हा राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जातील.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.