Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या तीन मागण्या सरकारकडून मान्य, लेखी आश्वासनही दिले! धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे काय?

Sonam Wangchuk Dharmendra Pradhan : सरकारने दिलेल्या लिखीत आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मध्यरात्री सोडले. या तीन आश्वासनामध्ये धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख नाही.
Sonam Wangchuk receives a written assurance from the Central Government after discussions on three key demands related to the Ladakh movement.
Sonam Wangchuk receives a written assurance from the Central Government after discussions on three key demands related to the Ladakh movement.sarkarnama
Published on
Updated on

Sonam Wangchuk News : सोनम वांगचुक यांनी अखेर 26 दिवसानंतर सरकारच्या लेखी आश्वासना नंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारने वांगचुक यांच्या तीन मागण्या मान्य केल्या आहेत.

सरकारने लेखी दिलेल्या तीन आश्वासनामध्ये जंतरमंतरवर शांतीपूर्ण आंदोलन करणाऱ्या आणि 20 जुलैला संसदवरील मोर्चात सहभागी झालेल्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, असे म्हटले आहे.

दुसऱ्या आश्वासनामध्ये संसदेत पेपर लीक, परीक्षा सुधारणा प्रणालीवर चर्चा केली जाईल, असा उल्लेख आहे. तर,तिसऱ्यामध्ये नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे म्हटले आहे.

शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू झाले होते. अभिजीत दीपके यांच्यासह अनेक जण धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. मात्र, सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख नाही. त्यामुळे सध्यातरी त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे दिसते आहे.

Sonam Wangchuk receives a written assurance from the Central Government after discussions on three key demands related to the Ladakh movement.
CJP Protest: एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक राहिलेला नेता आला समोर, 'सीजेपी'च्या पेटलेल्या आंदोलनात घेतली उडी,भाजप सरकारला झाप झाप झापलं

मध्यरात्री उपोषण मागे

सोनम वांगचुक यांना मंत्री जे पी नड्डा हे रात्री रुग्णालयात भेटले. या भेटीनंतर त्यांनी वांगचुक यांच्या तीन मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. वांगचुक यांनी ट्विट करत सांगितले की, विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

Sonam Wangchuk receives a written assurance from the Central Government after discussions on three key demands related to the Ladakh movement.
NEET Protest: दिपके अन् वांगचूक यांच्या आंदोलनावर भाजपचा 'Silent Strike'; मोदी सरकारच्या 20 दिवसांच्या 'शांततेमागचं' खरं राजकारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com