Sonia Gandhi Autobiography: पेंग्विनने का नाकारलं सोनिया गांधींचं आत्मचरित्र? आता हार्परकॉलिन्स छापणार ‘बिलॉन्गिंग’

Sonia Gandhi Autobiography Belonging: सोनिया गांधींच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच भारताशी त्यांचे नाते आणि देशातील त्यांचा प्रवास याचा एक वेगळा दृष्टिकोन या आत्मचरित्रातून वाचकांसमोर येणार आहे. या पुस्तकाबाबत उत्सुकता आहे.
Sonia Gandhi Autobiography Belonging
Sonia Gandhi Autobiography BelongingSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राला अखेर नवा प्रकाशक मिळाला आहे. ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आता हार्परकॉलिन्स इंडिया करणार आहे. यापूर्वी हे पुस्तक भारतात प्रकाशित करण्यासाठी पेंग्विन रँडम हाऊस इंडिया उत्सुक होते. मात्र, पुस्तकातील काही मजकुराच्या संपादनावरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद झाल्यानंतर पेंग्विनने प्रकाशनातून माघार घेतली होती.

हार्परकॉलिन्स इंडियाने शुक्रवारी या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा केली. ‘बिलॉन्गिंग’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी भारतात प्रकाशित होणार आहे. प्रेम, ओळख, कर्तव्य आणि आपलेपणाच्या भावनेसोबतच भारतातील आपल्या प्रवासाचे वैयक्तिक अनुभव सोनिया गांधी यांनी या पुस्तकातून मांडले असल्याचे प्रकाशकाने म्हटले आहे.

सोनिया गांधींच्या आयुष्याचा ‘अंतर्गत’ प्रवास

हार्परकॉलिन्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे पुस्तकाची माहिती देताना ‘बिलॉन्गिंग’ हे आपल्या काळातील बहुप्रतीक्षित राजकीय आत्मचरित्रांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. प्रेम, ओळख, कर्तव्य आणि आपलेपणाची भावना याभोवती या पुस्तकाची कथा फिरते.

सोनिया गांधींच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच भारताशी त्यांचे नाते आणि देशातील त्यांचा प्रवास याचा एक वेगळा दृष्टिकोन या आत्मचरित्रातून वाचकांसमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रासोबतच प्रकाशनविश्वातही या पुस्तकाबाबत उत्सुकता आहे.

Sonia Gandhi Autobiography Belonging
Manoj Jarange: भुजबळांच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा पलटवार; “या वयात स्वतःची काळजी घ्या”, दिला सल्ला

पेंग्विनने प्रकाशनातून का घेतली माघार?

या आत्मचरित्राच्या प्रकाशनाबाबत काही दिवसांपूर्वी मोठी चर्चा झाली होती. पेंग्विन रँडम हाऊसच्या अमेरिकेतील अल्फ्रेड ए. नॉफ या प्रकाशन संस्थेने पुस्तकाच्या जागतिक प्रकाशनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी जगभरात प्रकाशित होणार होते.

मात्र, भारतातील प्रकाशनाबाबत पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने वेगळी भूमिका घेतली. पुस्तकातील मजकुराची तथ्य पडताळणी करणे ही प्रकाशकाची जबाबदारी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते.

Sonia Gandhi Autobiography Belonging
Sarathi Scholarship: मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथीचा मोठा निर्णय; परदेशी शिक्षणाची फी आता थेट संस्थेला

संपादनावरून निर्माण झाले मतभेद

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या म्हणण्यानुसार, पुस्तकातील काही भागांमध्ये बदल किंवा संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रकाशकाला वाटत होते. मात्र, या बदलांना सोनिया गांधी यांनी स्पष्टपणे नकार दिला. या मुद्द्यावर एकमत न झाल्याने पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने भारतात हे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीच्या प्रकाशनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता हार्परकॉलिन्स इंडिया या पुस्तकाचा भारतीय प्रकाशक असणार असल्याने हा वाद एका अर्थाने संपुष्टात आला आहे.

Sonia Gandhi Autobiography Belonging
ISRO चा ‘कमबॅक’! EOS-05 चे यशस्वी लॉन्च; सीमा, समुद्र अन् हवामानावर ठेवणार नजर!

१० नोव्हेंबरला वाचकांच्या भेटीला

हार्परकॉलिन्स इंडियाच्या घोषणेनुसार ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी भारतात उपलब्ध होणार आहे. सोनिया गांधी यांच्या वैयक्तिक अनुभवांसोबतच त्यांच्या भारतातील दीर्घ राजकीय आणि सामाजिक प्रवासाचे प्रतिबिंब या पुस्तकात पाहायला मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात या आत्मचरित्राकडे विशेष लक्ष लागले आहे. पेंग्विनच्या माघारीनंतर हार्परकॉलिन्सने प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारल्याने आता सोनिया गांधींचे हे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र नेमके काय सांगते, याची उत्सुकता वाचकांमध्ये निर्माण झाली आहे.

Related Stories

Rahul Gandhi message to Congress workers
Mohan Bhagvat_PM Narendra Modi_ Sonia Gandhi
Sonia Gandhi
Sonia Gandhi : ‘सोनिया गांधींनी वंदे मातरम् थांबवायला लावले?, राहुल गांधींना इशारा नेमका कशासाठी?' भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचं पहिलं स्पष्टीकरण
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com