Sonia Gandhi News : इंदिरा गांधींचा 'तो' निर्णय चुकीचा, सोनिया गांधींनी दिली कबुली; म्हणाल्या,...

Sonia Gandhi Emergency Indira Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या की, आणीबाणीनंतर झालेल्या नुकसानीला आळा घालण्यासाठी काँग्रेस नेते संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवणे आवश्यक होते.
Sonia Gandhi Book
Sonia Gandhi BookSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi News : ‘‘आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चूक होता. तत्कालीन पंतप्रधान आणि माझ्या सासू इंदिरा गांधी यांनाही त्याची जाणीव झाली होती, ’’ असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.

‘बीलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वरील मत व्यक्त केले आहे.

आणीबाणीच्या मुद्द्यावरून भाजपकडून सातत्याने काँग्रेस आणि गांधी घराण्याला लक्ष्य करण्यात येते. भाजपकडून आणीबाणीच्या निर्णयाला लोकशाहीची हत्या अशी उपमा देण्यात येते आणि हा दिवस ‘लोकशाही हत्या दिन’ म्हणून पाळण्यात येतो. काँग्रेसकडून या मुद्द्यावर फारसे भाष्य करण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांनी ही भूमिका मांडली.

आणीबाणीनंतर झालेल्या नुकसानीला आळा घालण्यासाठी काँग्रेस नेते संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवणे आवश्यक होते, असेही म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या मते, इंदिरा गांधी मनाने लोकशाहीवादी होत्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्वीकारलेल्या मार्गाबाबत त्या स्वतःही कधीच पूर्णपणे समाधानी नव्हत्या. या निर्णयाचे ओझे त्यांच्यावर होते. आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयावर गांधी कुटुंबातही मतभेद होते. माझे पती राजीव गांधी यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पुढील निवडणुकीपर्यंत थांबण्याचा सल्ला

Sonia Gandhi Book
Rahul Gandhi Action : राहुल गांधींचा दणका, चुकीला माफी नाही! काँग्रेसचे उपाध्यक्ष, सचिव निलंबीत

...बरेच नुकसान टाळता आले असते

आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयामुळे आमच्या कुटुंबातील तणावही वाढला होता. माझे पती राजीव गांधी यांनी आईला विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी त्यांचे ऐकले नाही. संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवले असते तर आणीबाणीनंतर झालेले बरेच नुकसान टाळता आले असते.

Sonia Gandhi Book
Rahul Gandhi: "एकदाचं 'दुध का दूध, पानी का पानी' करुन टाका! माझ्यावर अवमानयाचिका दाखल कराच"; राहुल गांधींचं PM मोदींना पुन्हा खुलं आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.