Rahul Gandhi Action : राहुल गांधींचा दणका, चुकीला माफी नाही! काँग्रेसचे उपाध्यक्ष, सचिव निलंबीत

Suspension 60 Youth Congress Functionaries : राहुल गांधींच्या दिल्लीतील रॅलीला गैरहजर राहणार्‍या पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.
India Alliance Rally
India Alliance RallySarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. रामलीला मैदानावर त्यांनी रॅली करत ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणी केली. इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, रॅलीली गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल राव यांनी गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे मध्य प्रदेश काँग्रेसने मत चोरी रॅलीला गैरहजर राहाणाऱ्या तब्बल युथ काँग्रेसच्या तब्बल 60 जणांचे एकाच वेळी निलंबन केले आहे.

अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली संघटनात्मक शिस्तहीनता अत्यंत गांभीर्याने घेतली असल्याचे काँग्रेस नेतृत्वाने सांगितले आहे.तसेच मध्य प्रदेश युथ काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित असतील असे सांगितले आहे.

राज्य उपाध्यक्ष, सचिव निलंबित

मध्य प्रदेशमध्ये युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली असताना हरिणामध्ये थेट काँग्रेसचे उपाध्यक्ष, राज्य सचिव यांच्यासह जिल्हाध्यक्ष अशा दहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. हरिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नवदीप दलाल, राज्य सचिव असलेले विकास कुमार, योगेश फोगट, सिकंदर प्रधान, अझरुद्दीन अझर, प्रतीक चौधरी, सतीश कुमार, नवीन यादव तसेच रोहतकचे जिल्हाप्रमुख सुशील हुडा यांच्या निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.