Sonia Gandhi news : सोनिया गांधींकडून आत्मचरित्रात पंतप्रधान मोदींविषयी अनेक खुलासे; कुठे झाला संवाद? कशामुळे तीव्र मतभेद?

Sonia Gandhi autobiography, Sonia Gandhi book, Narendra Modi : सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात गुजरात दंगलीचा उल्लेख केला आहे. तेव्हा नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री होते.
Sonia Gandhi discusses her ideological differences with Prime Minister Narendra Modi and recalls the 2002 Gujarat riots in her autobiography, 'Belonging: A Journey of Love'.
Sonia Gandhi discusses her ideological differences with Prime Minister Narendra Modi and recalls the 2002 Gujarat riots in her autobiography, 'Belonging: A Journey of Love'.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Belonging : A Journey of Love update : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रातून अनेक महत्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय विचारसरणी, त्यांच्याशी असलेले मतभेद, प्रत्यक्ष संवाद, गोध्रा दंगल आदी मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय विचारसरणी आणि आपल्या विचारसरणी मोठे अंतर असल्याचे सांगत सोनिया गांधी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींची भारताची कल्पना ही आरएसएसच्या विचारवंतांनी आणि त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या अनुभवातून तयार झाली आहे. आम्ही वेगवेगळ्या वैचारिक विश्वातून आलो आहोत. या देशाबद्दलची त्यांची कल्पना माझ्या कल्पनेपेक्षा खूपच वेगळी आहे, असे सोनिया गांधी यांनी नमूद केले आहे. विचारसरणीवरून तीव्र मतभेद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी यांनी मोदींच्या भारताविषयीच्या कल्पनेला मूलतत्त्ववादाशी जोडले आहे. मोदींच्या कल्पनेतील भारतात श्रद्धा आणि संस्कृती इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ होती. त्या भारतात पदानुक्रम, सुव्यवस्था आणि नियंत्रण हे केंद्रस्थानी आहे. ते त्यांच्या भारताच्या संकल्पनेसाठी लढत होते. मी सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायासाठी उभ्या असलेल्या वर्चस्ववादाच्या विरोधात असलेला भारतासाठी लढत होते, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.

Sonia Gandhi discusses her ideological differences with Prime Minister Narendra Modi and recalls the 2002 Gujarat riots in her autobiography, 'Belonging: A Journey of Love'.
Gokul directors news : 'गोकुळ'मधील चार शासन नियुक्त संचालकांचे असे आहे राजकीय कनेक्शन; मंत्री, खासदार, आमदारांचे विश्वासू...

नरेंद्र मोदींसोबत प्रत्यक्ष संवाद, गाठीभेटींवर बोलताना सोनिया गांधींनी आत्मचरित्रात खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होऊन बारा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजपर्यंत, माझा त्यांच्याशी थेट असा कोणताही संपर्क झालेला नाही. आम्ही सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांमध्येच भेटतो. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर अध्यक्षांच्या कक्षात सर्व प्रमुख पक्षांचे नेते एकत्र येतात, तेव्हाच आम्ही भेटतो. ती एक खूप लहान खोली आहे आणि सहसा तिथे अनेक लोक उपस्थित असतात, पण जेव्हा ते माझ्यासमोर येतात, तेव्हा आम्ही औपचारिक नमस्कार करून एकमेकांना अभिवादन करतो, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

गुजरात दंगलीचा उल्लेख

सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात गुजरात दंगलीचा उल्लेख केला आहे. तेव्हा नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री होते. सोनिया गांधी यांनी लिहिले आहे की, २००२ मध्ये गुजरात राज्य जातीय दंगलींनी हादरले होते. अनेक हत्याकांडांचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण झाले आणि त्या भयावह दृश्यांनी देशाला हादरवून सोडले होते. साबरमती एक्सप्रेसच्या चार डब्यांना आग लावल्यानंतर या दंगली भडकल्या आणि त्यात ५९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला.

Sonia Gandhi discusses her ideological differences with Prime Minister Narendra Modi and recalls the 2002 Gujarat riots in her autobiography, 'Belonging: A Journey of Love'.
PM Modi news : मुख्यमंत्री फडणवीस यांची 'ही' कृती मनाला स्पर्श करणारी! PM मोदींना दिवाळीत कोणती गोष्ट भावली?

ट्रेनमध्ये हिंदू कारसेवक होते. आगीचे कारण अजूनही विवादास्पद आहे, परंतु राज्याच्या अनेक भागात दंगल उसळली. त्यात गेलेल्या बळींमध्ये बहुसंख्य मुस्लिम होते. गुजरातमधील दंगली भाजप आणि आरएसएसच्या बजरंग दल या कट्टर गटाने भडकवल्याचे म्हटले जाते, असेही सोनिया गांधीनी नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.