Sonia Gandhi Controversy : 'Poor Thing...त्यांना बोलताही येत नव्हते', राष्ट्रपतींच्या भाषणावर सोनिया गांधी काय म्हणाल्या? नवीन वादाला फुटले तोंड

Sonia Gandhi Reaction to President Droupadi Murmu Speech : मंत्री धमेंद्र प्रधान यांनी देखील सोनिय गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला आहे.
Sonia Gandhi Droupadi Murmu
Sonia Gandhi Droupadi Murmu sarkarnama
Published on
Updated on

Sonia Gandhi News : संसदेत आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांचे अभिभाषण झाले. या अभिषनावर संसदेच्या आवारात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.सोनिया गांधी म्हणाल्या, "राष्ट्रपती आपल्या अभिषाणाच्या शेवटपर्यंत खूप थकल्या होत्या.त्यांना बोलताही येत नव्हते. मला त्यांच्या विषयी वाईट वाटले. पुअर थिंक "

सोनिया गांधी यांनी पुअर हा शब्द वापरत प्रतिक्रिया दिल्याने भाजपने त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आपल्या ट्विटवरवरून सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना उद्देशून पुअर हा शब्द प्रयोग वापरणे अत्यंत अनादरकारक आहे. सर्वोच्च पदावर संवैधानिक असलेल्या व्यक्तीविषयी केलेल त्यांचे हे वक्तव्य हे विरोधी पक्षाकडून संविधाक पदावरील व्यक्तींचा सातत्याने केलेला अनादरच अधोरेखित करते. काँग्रेसने राष्ट्रपतींची आणि आदिवासी समुदायाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे.

Sonia Gandhi Droupadi Murmu
Raj Thackeray News : आधी शिंदेंशी पंगा, आता राज ठाकरेंनी भाजप अन् अजितदादांनाही दुखावलं; मनसेची महायुतीतील 'एन्ट्री' अडचणीत..?

मंत्री धमेंद्र प्रधान यांनी देखील सोनिय गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला आहे. हे लोक सरंमजाम आहेत. या लोकांकडून काय अपेक्षा करणार हे पूर्ण देशाला आपली इस्टेट समजतात.

सोनिय गांधी यांनी माफी मागण्याची मागणी भाजप नेत्यांनी केल्यानंतर काँग्रेस नेत्या, खासदार प्रियंका गांधी यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. देशाला बर्बाद करण्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे.

राष्ट्रपती भवनाकडून प्रतिक्रिया

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विधानावर राष्ट्रपती भवनाने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी केलेल्या टिपण्ण्यांमुळे उच्चपदच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिप्पण्या वाईट, दुर्दैवी आणि पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत.

Sonia Gandhi Droupadi Murmu
Shambhuraj Desai : मंत्री मुंडे भगवान गडाचे भक्त; मंत्री देसाई म्हणाले, 'महंतांनी त्यांना मोकळ्या...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com