Sri Lanka Prison Clash: दोन कट्टर विरोधक गटांमध्ये तुरुंगातच पेटला वाद, 3 अधिकाऱ्यांसह 25 कैद्यांचा मृत्यू,100 गंभीर जखमी

25 Dead, 100 Injured In Clashes At Sri Lanka Prison: श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या उत्तरेस असलेल्या नेगोम्बो तुरुंगात रविवारी(ता.5) रात्री सुरू झालेला हा हिंसाचार सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 5 तुरुंग रक्षक आणि 25 कैद्यांचा मृत्यू झाला आहे.
Prison Clashes
Prison Clashes Sarkarnama
Published on
Updated on

Sri Lanka News: भारताच्या शेजारील देश असलेल्या श्रीलंकेतून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. तुरुंगात नाश्त्याचं वाटप करताना झालेल्या वादानं नंतर हिंसक रूप धारण केलं. यादरम्यान, कैद्यांचे दोन कट्टर विरोधक गटच भिडले. यानंतर कैदी आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्येही भीषण संघर्ष झाला. या घटनेत सुमारे 25 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर श्रीलंकेतील विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा यांनी या हिंसाचाराची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या उत्तरेस असलेल्या नेगोम्बो तुरुंगात रविवारी(ता.5) रात्री सुरू झालेला हा हिंसाचार सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 5 तुरुंग रक्षक आणि 25 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारानंतर श्रीलंकेच्या तुरुंग प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील या तुरुंगांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. जास्तीत जास्त 10 हजार कैद्यांची क्षमता असलेल्या या तुरुंगात आजमितीला सुमारे 39 हजार कैदी ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नेगोम्बो तुरुंगातला हा वाद हिंसक झाला. सोमवारी सकाळपर्यंत याठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण होती.

न्याहारी वाटपावेळी वाद

तुरुंग विभागाचे माध्यम प्रवक्ते आणि आयुक्त ए. सी. गजानायके यांनी सांगितले की, हा दोन गटांतील वाद रविवारी रात्री झाला.तसेच सोमवारी पहाटे पुन्हा कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांवर काही कैद्यांनी हल्ला केला.तसेच यावेळी कैद्यांनी तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हातातील बंदुकाही हिसकावल्याचं समोर येत आहे.

तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत कैद्यांनी या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. तर काही कैद्यांनी थेट तुरुंगाचं मुख्य प्रवेशद्वारच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यानंतर तेथील अधिकाऱ्यांना ही तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकची कुमक मागवावी लागली. यानंतर पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करत ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

Prison Clashes
Missing Link News: '13.3 किमी रस्त्यासाठी 7,120 कोटींचा चुराडा...'; ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्यानं 'मिसिंग लिंक'वरुन सरकारचे वाभाडे काढले

नेगोम्बो रुग्णालयाचे संचालक पुष्पा गमलाथ यांनी सांगितले की, मृतांमध्ये पाच तुरुंग रक्षक आणि 20 कैद्यांचा समावेश आहे. 100 हून अधिक जखमी कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी झालेल्या आठ जणांना पुढील उपचारांसाठी कोलंबो राष्ट्रीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तुरुंग विभागाचे माध्यम प्रवक्ते आणि आयुक्त गजानायके यांच्या म्हणण्यानुसार, हा वाद संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या व्यवहारांशी संबंधित प्रतिस्पर्धी गटांमध्ये झाला होता. महिला कैद्यांचा विभाग या हिंसाचारात थेट सहभागी नव्हता. मात्र, काही महिला कैद्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन केले.

Prison Clashes
Nashik Conversion Case: नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर अन् अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट; मुख्य संशयित आरोपी निदा खानला जामीन मंजूर

परिस्थिती नियंत्रणात...

अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारावरील नियंत्रण पुन्हा मिळवले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. तुरुंगात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. तणाव कमी करण्यासाठी काही कैद्यांना इतर तुरुंगात हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com