Winter Session Maharashtra : सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून सरकारचा विरोध 

Maharashtra Winter Session 2023 : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीचे विधिमंडळ परिसरात आगळे-वेगळे आंदोलन
Ambadas Danave
Ambadas Danave Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Assembly Session 2023 : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दुष्काळग्रस्त भागात निधी वाटप आदी शेतकऱ्यांचे प्रश्न व मागण्यांवर आज (गुरुवारी ) हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून गुरुवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधान भवन परिसरात आगळे-वेगळे आंदोलन करून विधिमंडळ परिसर दणाणून सोडले.

 शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झगमगाट करत कार्यक्रम केला जातो. एकीकडे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना सरकार खोटी भूमिका घेत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतमजूर व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार संवेदनाहीन झालं असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danave
BJP Political News : 'छोटा राजन'चा साथीदार मंदार बोरकर आता भाजपमध्ये

सरकारला 120  मोर्चांना तोंड द्यावे लागणार 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक या आंदोलनाद्वारे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न यावर सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चे निघणार आहेत.

या वेळेला तब्बल 50 मोर्चांना प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच विधान भवनाच्या दारात आंदोलने पाहायला मिळणार आहेत. 70 मोर्चांना परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com