Supreme Court News : डीएमके नेत्याची खासदारकी वाचली ; उच्च न्यायालयाकडून दिलासा...

DMK MP Kanimozhi : त्यांच्या पॅनकार्डचा उल्लेख निवडणूक अर्जात केलेला नाही.
 DMK MP Kanimozhi
DMK MP Kanimozhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court Cancels Plea DMK MP Kanimozhi : डीएमके नेता आणि लोकसभेच्या खासदार कनिमोझी (MP Kanimozhi) यांना मद्रास उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

त्यांच्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी वाचली आहे. कनिमोझी या तामिळनाडू येथील तूतीकोरिन लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

खासदार कनिमोझी यांनी निवडणूक अर्जात आपल्या पतीच्या पॅन कार्डची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी ,अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

 DMK MP Kanimozhi
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

कनिमोझी यांनी या याचिकेच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायाधीश अजय रस्तोगी आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

 DMK MP Kanimozhi
NCP New President: शालिनीताईंचा शरद पवारांना ज्येष्ठतेचा सल्ला; म्हणाल्या, 'अजित पवार घोटाळेबाज.., त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल!

खासदार कनिमोझी म्हणाल्या, "माझे पती हे सिंगापूर येथे राहतात, भारतात त्यांचा कोणत्याही आर्थिक व्यवहार नाही, त्यामुळे त्यांच्या पॅनकार्डचा उल्लेख निवडणूक अर्जात केला नाही, याचिकाकर्त्यांचा याबाबत चुकीची माहिती मिळाली आहे,"

मद्रास उच्च न्यायालयात एका मतदाराने ही याचिका दाखल केली होती. कनिमोझी यांचे वती सिंगापूर येथील नागरिक असल्यामुळे त्यांच्याकडे भारतात आर्थिक व्यवहार केल्याचे पॅन कार्ड नाही, असे कनिमोझी यांच्या वकीलाने म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com