.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
New Delhi News: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही मोठी फूट पडली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आहेत. याच बंडखोरांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयात ही याचिका फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर खासदारांविरोधात याचिका सुनावणीसाठी स्वीकारण्यास नकार दिला आहे. ही याचिका वकील जया सुकिन यांनी दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी पक्षांतर आणि दबावाखाली पक्षप्रवेश करणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं बंडखोर खासदारांविरोधात दाखल याचिकेवर मोठा निर्णय दिला. यावेळी त्यांनी याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले. कारण दाखल याचिकेत याचिकाकर्त्यांनी पूर्व भारतातील एका राज्य आणि मध्य भारतातील दुसऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
पण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांनी याचिकेत कोणत्याही पक्षाचे नाव किंवा बंडखोर लोकप्रतिनिधींचं नमूद करण्यात आलं नव्हतं. तसेच या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावेही सादर करण्यात आले नसल्याचा निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं.
तसेच याकोणत्या पक्षासंदर्भात आहे? मात्र याचिकेत कोणत्याही विशिष्ट पक्षाचे किंवा लोकप्रतिनिधींचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. नेमकं शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली वाढल्या असतानाच बंडखोर लोकप्रतिनिधींविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयानं फेटाळल्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांना झाप झाप झापलं. ते म्हणाले तुम्ही मला एक मिनिट मागितला होता, मात्र, तुम्हाला सात मिनिटं देण्यात आली. मात्र ही याचिका अतिशय संभ्रमात टाकणारी आहे. तसेच याचिकेत करण्यात आलेले आरोपही सामान्य स्वरूपाचे आहेत. त्यांना आधार देणारा कोणताही ठोस पुरावा सादर केल्याचं स्पष्ट करत सरन्यायाधीशांनी ही याचिकाच फेटाळून लावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.