Rohit Pawar, Supreme Court
Rohit Pawar, Supreme CourtSarkarnama

Rohit Pawar News : मोठा ‘फ्रॉड’ करण्यापासून तुम्हाला रोखले! रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सरन्यायाधीश संतापले...

Supreme Court verdict : माजी क्रिकेटपटू व असोसिएशनचे सदस्य केदार जाधव यांच्यासह अन्य काही जणांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Published on

MCA Apex Council elections : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने चांगलाच झटका दिला आहे. असोसिएशनच्या निवडणुकीवर मुंबई हायकोर्टाने घातलेली स्थगित उठविण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्याचप्रमाणे कोर्टाने याप्रकरणी कठोर निरीक्षण नोंदवत रोहित पवार यांना फटकारले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या निवडणुकांवर हायकोर्टाने काही दिवसांपूर्वीच स्थगिती  दिली आहे. त्याविरोधात असोसिएशनकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत तसेच न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावलीला आले होते.

थेट सरन्यायाधीश यांनीच या प्रकरणार अतिशय थेट पण कठोर शब्दांत निरीक्षण नोंदवले. हायकोर्टाने घातलेली स्थगिती योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने कठोर टिप्पणी केली. खंडपीठ म्हणाले, हायकोर्टाने तुम्हाला आणखी मोठी फसवणूक करण्यापासून रोखले आहे. आमच्याकडून आणखी कठोर टिप्पणी करून घेऊ नका, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

Rohit Pawar, Supreme Court
Maharashtra MP suspended : लोकसभेत जोरदार घमासान, महाराष्ट्रातील एका खासदारासह 8 जण निलंबित; अध्यक्षांनी राहुल गांधींना रोखले...

सुप्रीम कोर्टाने याचिका मागे घेण्यास सांगितले अन्यथा फेटाळून लावू असे सांगितले. त्यानंतर याचिका मागे आल्याने कोर्टाने हे प्रकरण निकाली काढले. त्याआधी कोर्टाने नमूद केले की, हे प्रकरण सध्या हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे एमसीएने तिथेच आपले म्हणणे मांडावे.

Rohit Pawar, Supreme Court
Shiv Sena news : एक नगरसेवक असूनही उपमहापौरपद, माजी आमदाराचे पुत्र भडकले; शिंदेसेना अडगळीत जाण्याची भीती...

काय आहे प्रकरण?

असोसिएशनच्या निवडणुकीआधी दोन महिन्यांतच तब्बल ४०० सदस्यांची नोंदणी करण्यात आली होती. माजी क्रिकेटपटू व असोसिएशनचे सदस्य केदार जाधव यांच्यासह अन्य काही जणांनी त्यावर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याच याचिकेवरून हायकोर्टाने सहा जानेवारीला निवडणुकीवर स्थगिती घातली आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता रोहित पवार यांच्या पत्नी, सासरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा दावा जाधव यांनी याचिकेत केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com