Shiv Sena news : एक नगरसेवक असूनही उपमहापौरपद, माजी आमदाराचे पुत्र भडकले; शिंदेसेना अडगळीत जाण्याची भीती...

Kolhapur Deputy Mayor : सत्यजित जाधव यांच्यावर न्यायालयात कारवाईसाठी धाव घेण्यात आली आहे. या कारवाईची भीती ठेवून उपमहापौरपदासाठी कोणतेही रिस्क घेत नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Satyajit Jadhav upset : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी सोमवारी महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी निकम तर शिवसेनेच्या कोट्यातून जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली. मात्र शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेले माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव नगरसेवक सत्यजित जाधव हे नाराज झाले. उपमहापौर पदासाठी शिवसेनेतून एकाला संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांची होती.

महापौर पदासोबत शिवसेना उपमहापौर पदासाठी देखील इच्छुक होती. मात्र महायुतीच्या चर्चेअंती पहिला महापौर हा भाजपचा होणार असल्याने उपमहापौर पद हे शिवसेनेकडे आले. त्यामुळे शिवसेनेतून 15 नगरसेवकांमध्ये इच्छुकांनी चांगली फिल्डिंग लावली होती. त्यामध्ये नगरसेवक सत्यजित जाधव हे देखील त्या पदासाठी इच्छुक होते.

कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्याने तो उमेदवार ज्यांना पाठिंबा देईल, त्याची स्वीकृत आणि विविध समिती सदस्य संख्येवरील वाढ होणार होते. त्यामुळे भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपड केली होती. अखेर अक्षय जरग हे शिवसेनेच्या तंबूत गेले. मात्र सत्यजित जाधव यांच्यावर न्यायालयात कारवाईसाठी धाव घेण्यात आली आहे. या कारवाईची भीती ठेवून उपमहापौरपदासाठी कोणतेही रिस्क घेत नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Kolhapur Municipal Corporation
Sangli Politics : ZPचे राजकारण तापले! एकमेकांना सांभाळून बोलणारे नेते आक्रमक झाले, भाजप आमदार आणि काँग्रेसच्या खासदारात वाद पेटला

जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय रविवारी रात्री विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला होता. त्यानंतर सत्यजित जाधव यांनी या पदासाठी आग्रह धरला. महापौर, स्थायी समिती सभापती पद हे भाजपला जाणार आहे. उपमहापौरपदही जनसुराज्य शक्तीला दिले तर शिंदेसेनेला कोणतेच पद मिळणार नाही. शिवसेनेचा उपमहापौर करावा, अशी त्यांची इच्छा होती.

Kolhapur Municipal Corporation
Gore Attack On Desai : मी आमदार हाय, माझ्याशिवाय तुमचं काम होणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याकडून दमबाजी, जयकुमार गोरेंचा आरोप

सुरुवातीला शिवसेनेकडे उपमहापौर पद आल्याने या पदासाठी पक्षाने माझ्या नावाचा विचार केला होता. मात्र रविवारी काही घडामोडी घडल्या. त्यामध्ये उपमहापौर पद शिवसेनेच्या कोट्यातून जनसुराज्य शक्तीचे नगरसेवक अक्षय जरग यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या संदर्भात नाराज नाही. पण हे पद शिवसेनेच्या एखाद्या नगरसेवकाला मिळणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया नगरसेवक सत्यजित जाधव यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com