Supreme Court Sanjay Raut : "आम्ही वकील असल्यापासून तुमची भाषणे ऐकतोय...", सुप्रीम कोर्टाने संजय राऊतांना नेमकं काय सुनावलं?

Supreme Court remarks on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत नेमकं काय सुनावलं? सुनावणीदरम्यान न्यायालयाने केलेली महत्त्वाची टिप्पणी आणि संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut Supreme Court Hearing : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेविरोधातील सोशल मीडिया पोस्टवरून चांगलेच सुनावले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणात सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी राऊत यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

"तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात. आम्ही वकील असल्यापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही एक अनुभवी संसद सदस्य आहात आणि स्वतःही पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित होतात. त्यामुळे, संयम कसा पाळावा, हे तुम्हाला माहित असायला हवे," अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना सुनावले.

Sanjay Raut
Education Department SOP : खासगी शाळांच्या मनमानीला बसणार चाप! प्रवेश, फी अन् गणवेशाबाबत शिक्षण विभागाचे कडक नियम!

संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (SCBA) फौजदारी अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप दोघांवर आहे.

सुनावणीदरम्यान SCBA चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टचा मुद्दा उपस्थित केला. राऊत यांनी यापूर्वी माफी मागितली असली, तरी त्यानंतरही न्यायव्यवस्थेवर टीका करणाऱ्या पोस्ट केल्याचा दावा त्यांनी केला. भाजपने लोकशाही, न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोगावर नियंत्रण मिळवल्याचा आरोप करणाऱ्या पोस्टचाही त्यांनी उल्लेख केला.

Sanjay Raut
Gram Panchayat : गावच्या विकासाचा मोठा गेमचेंजर निर्णय! आता गावगाडा चालणार थेट 'स्वबळावर'; ग्रामपंचायतींना मिळाले उत्पन्नाचे नवे मार्ग

या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील राजकीय टीका, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता संजय राऊत आणि निखिल वागळे यांच्या स्पष्टीकरणानंतर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.