Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Supriya Sule News : ‘कृषी’तील कथित भ्रष्टाचार प्रकरण पोहचले संसदेत; मोदींचे नाव घेत सुप्रिया सुळे बरसल्या...

Parliament session Lok Sabha News Agriculture Corruption latest update : सुप्रिया सुळे यांनी याआधीही पीक विम्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता.
Published on

New Delhi News : कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत आहे. आता हे प्रकरण थेट संसदेत पोहचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबीटीचा मुद्दा सोमवारी लोकसभेत उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.

अर्थसंकल्पावर बोलताना सुप्रिया सुळेंनी डीबीटीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, बीडमधील एका सरपंचांचा खून झाला. आवादा कंपनी खंडणी प्रकरणामुळे हा खून झाला. त्यानंतर काय समोर आले, हे महत्वाचे आहे. अनुराग ठाकूर आम्हाला घोटाळेबाज म्हणतात, त्यांना (सरकारला) प्रश्न विचारते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी डीबीटीचा मुद्दा उपस्थित केला.

Supriya Sule
Bachchu Kadu : बच्चू कडूंनी विरोधकांचा 'गेम पलटवला'; आता 'कुटनीती' खेळणार

सरकार शेतकऱ्यांचे आहे, सर्व शेतकऱ्यांना डीबीटीतून अनुदान मिळेल, असे हे बोलतात. पण महाराष्ट्रात डीबीटीमध्ये बदल करण्यात आला. सरकारनेच निर्णय घेतला. कृषी मंत्रीच म्हणाले, डीबीटी नको, सरकार खरेदी करेल. नॅनो यूरियाची एक बाटली 92 रुपयांत मिळते, महाराष्ट्र सरकारने ती 220 रुपयांना खरेदी केली. तर 269 रुपयांची नॅनो डीएपीची बाटली सरकारने 590 रुपयांना घेतली.

कापूस साठवण बॅग ज्याची किंमत 577 रुपये आहे, ती 1200 रुपयांना विकत घेण्यात आली. आणि हे आम्हाला घोटाळेबाज म्हणत आहे, असा हल्ला सुळेंनी चढवला. सुळे यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तालिका अध्यक्षांनी राज्याचा मुद्दा आहे, याचे उत्तर हे कसे देतील, असा आक्षेप घेतला. त्यावर सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान जर डीबीटीविषयी बोलत असतील तर त्यांचे डबल इंजिनचे सरकार का त्यांचे ऐकत नाही, अशी विचारणा केली.

Supriya Sule
Congress Leader : दिल्लीत 'आप'च्या पराभवानंतर INDIA आघाडी टिकेल का? काँग्रेस नेत्याने दिले 'हे' उत्तर

सुप्रिया सुळे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला नाही. काही दिवसांपूर्वीही त्यांनी लोकसभेत राज्यातील पीक विमा योजनेतील घोटाळ्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कारवाईचा इशारा दिला होता. कुठे गडबड झाली आणि ती सिद्ध झाली तर गडबड करणाऱ्याला सोडणार नाही. ही आमची कटिबद्धता आहे, असे चौहान यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com